Shivsena : नाशिकच्या 34 नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेना वाढवण्याबाबत केले मार्गदर्शन

| Updated on: Jul 24, 2022 | 1:26 PM

मालेगावचे नगरसेवक व माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आले आहेत. आज आम्ही आनंदी आहोत आमच्या पक्षप्रमुख भेटले त्यांचे विचार ऐकले.

Shivsena : नाशिकच्या 34 नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेना वाढवण्याबाबत केले मार्गदर्शन
शिवसेना वाढवण्याबाबत केले मार्गदर्शन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक – आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आणि मालेगावमधील नगसेवक उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या भेटीला आले आहेत. ते मातोश्रीत (Matoshree) दाखल झाले असून ते आम्ही तुमच्यासोबत असल्याचे समर्थन दाखवण्यास आले आहेत. 34 नगरसेवक मातोश्रीत दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मातोश्रीच्या बाहेर दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिकच्या महापालिकेच्या निवडणुकीत या सगळ्यांचा शिवसेनेला नक्की फायदा होईल. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटात अनेक आमदारांच्या आणि खासदारांच्या पाठोपाठ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला होता. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही प्रतिज्ञापत्र ही देणार आहोत की आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहोत. कितीही आमदार खासदार फुटू देत आम्ही मालेगाव चे पदाधिकारी, नगरसेवक उद्धव साहेबांसोबतच आहोत असं नगरसेवक राजाराम जाधव यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे देखील लवकरचं राज्याचा दौरा करणार

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण पुर्णपणे बदललं आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आत्तापासून बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील लवकरचं राज्याचा दौरा करणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत एक वेगळं चित्र पाहायला मिळणार एवढं मात्र निश्चित आहे. मातोश्रीवर विनायक राऊत देखील आता दाखल झाले आहेत. मालेगावचे नगरसेवक व माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आले आहेत. आज आम्ही आनंदी आहोत आमच्या पक्षप्रमुख भेटले त्यांचे विचार ऐकले. मालेगाव शहर आणि नांतदगाव मधील आमदारांनी बंड केले तिथे पुन्हा शिवसेना कशी येईल याचं मार्गदर्शन केलं. शिवसेनेचे सक्रिय सदस्यांनी पुन्हा आम्ही पक्षासोबत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. तमाम मुस्लिम बांधवांना माझी विनंती उद्धव साहेबांना साथ द्या प्रतिज्ञापत्र द्या, परत कोणी गद्दारी करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका

24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या , मंत्रिमंडळ विस्तार नाही अशी विरोधक टीका करीत आहेत. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले. “विरोधकांचे काम आहे टीका करणे त्यांच्या असंवेदनशीलतीमुळे ही परिस्थिती आली आहे. गडकरी यांचे वक्तव्य सत्ता कारण होत आहे. राजकारणात बदल होत असतात. देवेंद्र फडणवीस यांची गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. संजय राऊत यांना आता तरी समज यायला पाहिजे, त्यांनी पक्षाची काय अवस्था केली हे माहिती आहे. कशाला त्यांच्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारता अस म्हणतं देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

हे सुद्धा वाचा