नदीजोड प्रकल्प म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा महाउद्योग : पर्यावरण तज्ज्ञ एच. एम. देसरडा

| Updated on: Aug 19, 2019 | 5:56 PM

नदीजोड प्रकल्प (National River Linking Project) म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा महाउद्योग असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण तज्ज्ञ एच. एम. देसरडा (H M Desarda) यांनी केला आहे.

नदीजोड प्रकल्प म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा महाउद्योग : पर्यावरण तज्ज्ञ एच. एम. देसरडा
Follow us on

उस्मानाबाद : नदीजोड प्रकल्प (National River Linking Project) म्हणजे कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा महाउद्योग असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण तज्ज्ञ एच. एम. देसरडा (H M Desarda) यांनी केला आहे. भाजप सरकार काँग्रेस सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट पद्धतीने काम करत आहेत. जास्त आपत्ती म्हणजे पैसे कमविण्याचे साधन असून नदीजोड मधील ग्रीड प्रकल्प म्हणजे जाळे जोडणे नव्हे तर तो हव्यास व लोभ आहे, असेही देसरडा यांनी सांगितले.

एच. एम. देसरडा म्हणाले, ‘हजारो वर्षाच्या नद्यांचा प्रवाह बदलणे म्हणजे नद्यांचे फुफुस काढून घेण्याचा प्रकार आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मंत्रालयातून राज्याचा लिलाव करत आहेत.”

सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार मोडीत काढून भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे हे सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच पक्षात घेत आहे, असेही देसरडा यांनी नमूद केलं.

‘पाऊस हुलकावणी, तर सरकार धोका देत आहे’

मराठवाड्यातील दुष्काळला पर्याय आहे. तेथे जितका पाऊस पडत आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी आणि पिकासाठी पुरेसा आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करत माथा ते पायथा काम करणं गरजेचं आहे. पाऊस हुलकावणी देत आहे, तर सरकार धोका देत आहे. जलसंचय करणे हा एक उत्तम पर्याय असल्याचे मत एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केलं.