उद्धव ठाकरे हतबल, त्यांच्या वक्तव्याला कुणी गंभीरपणे घेऊ नये; भाजपचा थेट हल्लाबोल

Anil Bonde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नैतिकता सोडलीये, त्यांना ईडी-सीबीआयची भीती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे हतबल, त्यांच्या वक्तव्याला कुणी गंभीरपणे घेऊ नये; भाजपचा थेट हल्लाबोल
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 26, 2023 | 3:52 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण या सगळ्यात उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला भाजपच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे हतबल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे भाजपला सत्ता भक्षक म्हणतात पण ते स्वत: हतबल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला कुणी गंभीरपणे घेऊ नये. स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी उद्धव ठाकरे आरोप करत आहेत, असं अनिल बोंडे म्हणालेत.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांच्यावर निशाणाही साधला आहे.उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मी स्वतः शुभेच्छा दिल्यात आणि संदर्भातला एक पत्र सुद्धा मी त्यांना लिहिलं आहे, असं मुनगंटीवार म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी नैतिकता सोडली आहे. एवढे दिवस सोबत राहुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. सोनिया गांधी यांच्याजवळ सुद्धा त्यांना जागा सुद्धा मिळणार नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आमचं राजकारण डब्यात गेलं नाही. तर त्यांचं राजकारण जे आहे ते डब्यामध्ये गेलं आहे. ईडीसीबीआयची उद्धव ठाकरे यांना भीती वाटते. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नीतिमत्ता सोडली. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले जे 40 आमदार निघून गेले. हे आमदार त्यांना सोडून गेले हे त्यांचं सगळ्यात मोठा अपयश आहे. बंद दारावर काय घडलं हे त्यांना देखील माहितीये आणि त्यामुळे त्यांनी अशा वल्गना करू नये, असं मुनगंटीवार म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. पण ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं.भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. ते अत्यंत चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांनी मतं मागितली. त्याच मोदींपासून भाजपपासून ते विभक्त झाले. ही गद्दारी नाही तर काय आहे? असा सवाल भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी विचारला आहे.