NMMC Election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे शिवसेना-भाजपकडून जय्यत तयारी; प्रभाग क्र. 21 साठी उमेदवारांना करावी लागणार तारेवरची कसरत

| Updated on: Aug 21, 2022 | 7:35 AM

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग( महिला), सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण गटासाठी हा प्रभाग आरक्षित झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या प्रभागावर कोणाच वरचष्मा राहणा हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आपापल्या प्रभागामध्ये निवडणुकीचे वातावरण गरम केले आहे.

NMMC Election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे शिवसेना-भाजपकडून जय्यत तयारी; प्रभाग क्र. 21 साठी उमेदवारांना करावी लागणार तारेवरची कसरत
Follow us on

नवी मुंबईः राज्यातील मनपा निवडणुका यंदा जोरदार होणार आहेत, राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा या निवडणुकांवर साहजिकच परिणाम दिसणार आहे. म्हणून मुंबईत झालेल्या भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच मुंबई महानगरपालिकेवर शिंदे गटाच्या शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकवायचा आहे असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीही आता मुंबई आणि नवी मुंबई महानंगरपालिकेसाठी (Navi Mumbai Municipal Corporation) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी करुन राज्यातील ठाकरे सरकारची सत्ता उलथवून टाकण्यात यशस्वी झाली असली तरी त्याचा सकारात्मक, नकारात्मक परिणाम या निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 21 (Ward No. 21) वर ज्या प्रमाणे शिंदे गटाच्या नजरा लागून राहिल्या आहेत, त्याचप्रमाणे ठाकरे घराण्यानेही आता आपले लक्ष नवी मुंबई महानगरपालिकेकड वळवले आहे.

आरक्षणाचा काय होणार परिणाम

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग( महिला), सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण गटासाठी हा प्रभाग आरक्षित झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या प्रभागावर कोणाच वरचष्मा राहणा हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आपापल्या प्रभागामध्ये निवडणुकीचे वातावरण गरम केले आहे. मुंबई परिसरातील महनगरपालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुका आधीपासूनच चर्चेचा विषय आणि मोठ्या राजकीय घडामोडींनी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील नेत्यांसह मुंबईतील नेत्यांनीही मुंबईतील महानगरपालिकांसाठई आतापासूनच कंबर कसली आहे. आरक्षण जाहीर झाल्याने निश्चित उमेदवारांनी आतापासूनच आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

नमुंबमपाचा प्रभाग क्र. 21

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.21 मध्ये जुहू गाव वाशी सेक्टर 11, सेक्टर 12, सेक्टर 14 व इतर परिसर येतो. या प्रभागांमध्ये उत्तर भागांमध्ये ठाणे, बेलापूर, खाडीपूर्वी, महावीर रतन सेक्टर 12, वाशी हा परिसर आहे तर पूर्व भागामध्ये महावीर रतन सेक्टर 12, वाशी पुढे दक्षिणेस कोर्सिका अपार्टमेंट प्लॉट नंबर 44 सेक्टर नंबर 29 पुढे दक्षिणेस साईप्रसाद बिल्डींग प्लॉट नंबर 63 सेक्टर नंबर 14 त्याच्यापुढे पूर्वेस नाना नानी पार्क सेक्टर 14 पामबीच मार्गाने दक्षिणेस पीकेसी हॉस्पिटल सेक्टर 14 पर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

तर दक्षिण बाजूला ठाणे खाडी पासून पूर्वेस बाबा विला प्लॉट नंबर 90/91 सेक्टर 10 वाशी पुढेच पूर्वेस शकुंतला को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी सेक्टर नंबर 10 त्याच्या पुढे श्रद्धा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज वळसा घालून पूर्वेस रेम्बो बिल्डिंग सेक्टर 11 वाशी त्यापुढे दक्षिणेस स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन प्लॉट नंबर 45 हे सेक्टर 14 15 पुढे पूर्वेस बीकेसी हॉस्पिटल 14 पानबीज रस्त्यापर्यंत आहे तर पश्चिमेस ठाणे बेलापूर खाडी पर्यंत हा परिसर आहे.
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष