परभणीत राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे एकदाच राजीनामे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

परभणी : लोकसभा निवडणुकीपूर्वी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बंड केलय. हे बंड एवढं उफाळून आलंय की 18 पैकी 13 नगरसेवकांनी पदाचे राजीनामेही दिले आहेत. हा लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि दणका समजला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून […]

परभणीत राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे एकदाच राजीनामे
Follow us on

परभणी : लोकसभा निवडणुकीपूर्वी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बंड केलय. हे बंड एवढं उफाळून आलंय की 18 पैकी 13 नगरसेवकांनी पदाचे राजीनामेही दिले आहेत. हा लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का आणि दणका समजला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध नावांची चर्चा सुरू आहे. अद्याप तरी उमेदवारांच्या निवडीची घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांविरुद्ध मोठे बंड उभारण्यात आले आहे.

राजीनामास्त्र नेमकं कशामुळे?

परभणी महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झालाय. जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून 18 पैकी 13 नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवड करायची होती.

एका जागेसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने 29 जानेवारीपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेताली गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्यांनी मंगळवारी अतिक इनामदार यांचा स्वीकृत पदासाठी मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

या नगरसेवकांची नाराजी

या संदर्भात 1 फेब्रुवारी रोजी नगरसेवक बालासाहेब बुलबुले, चाँद सुभाना जाकेर खान, अमरिका बेगम अब्दुल समद, विकास लंगोटे, संगिता दुधगावकर, अली खान मोईन खान, वर्षा खिल्लारे, शेख फहेद शेख हमीद, आबेदाबी सय्यद अहेमद, अमोल पाथरीकर, शेख आलिया अंजूम, मो. गौस, नाजेमा बेगम शेख अब्दुल रहीम या 13 नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले.

नगरसेवकांचा आक्षेप काय आहे?

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी विश्वासात न घेता गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या सहीने अतिक इनामदार यांचा अर्ज भरला. जे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हते. नगरसेवकांना विचारात घेऊन उमेदवार दिला जात नसेल तर पक्षात राहून काय उपयोग, असेही या संदर्भात निवेदनात या नगरसेवकांनी नमूद केले. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. परिहार, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांच्यासह नगरसेवकांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना स्वीकृत सदस्य पदासाठी दिलेले नाव रद्द करावे, असे निवेदन दिले.

अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त करण्याचा निर्णय पक्षाच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता; पण, तसे न होता मनमानी पद्धतीने दुसराच अर्ज भरण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटनेत्याने दिलेले नाव विचारात घेऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. असेच स्वतंत्र निवेदन शहर जिल्हाध्यक्ष  यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, शहर जिल्हाध्यक्ष यांनी म्हटलंय की, अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या पत्नींना स्वीकृत सदस्यपदाची उमेदवारी देण्याचा गुरुवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता; पण 29 तारखेला परस्पर उमेदवारी बदलली गेली. त्यामुळे आ. दुर्राणी यांच्या निर्णयाच्या विरोधात 13  नगरसेवकांनी आपल्याकडे राजीनामे दिले. याबाबत लवकरच अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घालणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.