सीपीआय, बसपा आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची चिन्हं

| Updated on: May 29, 2019 | 7:30 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर सीपीआयचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. या तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे. 2014 […]

सीपीआय, बसपा आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची चिन्हं
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर सीपीआयचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सीपीआयला फक्त दोन जागा मिळवता आल्या आहेत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. या तीनही पक्षांनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली आहे.

2014 च्या निवडणुकीत खराब कामगिरीनंतरही या पक्षांना दिलासा मिळाला होता. कारणष राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या निर्णयाची समीक्षा 5 ऐवजी प्रत्येक 10 वर्षांनी करणार असल्याचा नियम निवडणूक आयोगाने केला होता. त्यामुळे हा दिलासा आता जास्त काळ टिकणार नाही असं दिसून येतंय.

सीपीआय नेत्याच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला जाण्याचं संकट आहे. आमचं अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर नाही याचा निर्णय आयोगाकडून घेतला जाईल. आम्हाला अपेक्षा आहे, की आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा दर्जा काढल्यानंतरही पक्षाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही या नेत्याने सांगितलं.

काय आहे नियम?

या निवडणुकीत बसपाला 10, सीपीआयला 3 आणि राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. निवडणूक चिन्ह अधिनियम 1968 नुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याची गरज असते. याशिवाय त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार असणंही अनिवार्य आहे.