अजितदादा भेकड… शरद पवार गटाने वापरलेला शब्द लागला जिव्हारी; सुनील तटकरे यांनी जाहीर सुनावले

| Updated on: Nov 30, 2023 | 11:44 AM

NCP convention in Karjat | नवी दिल्लीत निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी कोणाची? याविषयावर युक्तीवाद सुरु आहे. या युक्तीवादात अजित पवार यांना भेकड म्हटले गेल्याचे सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय शिबिरात सांगितले. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आले असते का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

अजितदादा भेकड... शरद पवार गटाने वापरलेला शब्द लागला जिव्हारी; सुनील तटकरे यांनी जाहीर सुनावले
sunil tatkare
Follow us on

कर्जत पुणे, दि. 30 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक घाडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पाठीमागे अनेक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ आमदारांपैकी ४३ आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला. यावेळी निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या युक्तीवादासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. या युक्तीवादात अजित पवार यांना भेकड म्हटले गेल्याचे सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय शिबिरात सांगितले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आले असता का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

काय म्हणाले सुनील तटकरे

२०१६ मध्ये मला आणि दादांना सांगण्यात आले आपणास सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे. निवडणूक निकालआधी सांगण्यात आले होते. त्यावेळी तसे झाले असते तर २०१७ मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार आले असता.  आता भाजपने पाठिंबा मागितला नसताना आपण सरकारला पाठिंबा दिला. भाजपसोबत सत्तेत आलो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, असे तटकरे यांनी सांगितले.

दादा भेकड असते तर सरकार आले असता का?

सध्या सर्वांच्या टीकेचा लक्ष अजितदादा आहेत.  अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्यावर आम्ही मंत्र्यांना घेऊन भेटायला गेलो. महिनाभर आपण वाट पहिली. पण त्यानंतर अजितदादा  टीकेचे लक्ष आहे. निवडणूक आयोगासमोर बुधवारी राष्ट्रवादी कोणाची? यावर युक्तीवाद झाला. त्यात एक शब्दा ‘कावड’ वापरला गेला. कावड शब्दाचा मराठी अर्थ तिखट आहे. परंतु तो तुम्हाला माहिती हवा. कावड या शब्दांचा अर्थ भेकड आहे. अजित पवार जर भेकड असते तर हे सरकार आणण्याची हिंमत दाखवू शकले असते का? आता आपण कृतीतून दाखवून देऊ या की दादा यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक विश्वसार्हता असणारा नेता म्हणजे अजित पवार आहे. अजित पवार दिलेला प्रत्येक शब्द पाळतात. सामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वच स्तरावर अजित पवार शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात, असे तटकरे यांनी सांगितले.