‘सरकार तर नुसतं तोंड वाजवायलाच’, राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Raj Thakeray | राज ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत शिंदे सरकारच्या या धोरणावर टीका केली. पुण्यात त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. हे सरकार केवळ तोंड वाजवायलाच असल्याचा टोला त्यांनी हाणला. पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

'सरकार तर नुसतं तोंड वाजवायलाच', राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 3:37 PM

रणजित जाधव, प्रतिनिधी, टीव्ही९ मराठी, पुणे | 28 नोव्हेंबर 2023 : राज्य सरकार तर नुसतं तोंड वाजवायलाच आहे, असा ठाकरी टोला, राज ठाकरे यांनी सरकारला लगावला. त्यांनी राज्य सरकारच्या काही धोरणांचा खरपूस समाचार घेतला. मनसे मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन पुन्हा खळखट्याक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताचे याविषयीचे कान टोचले. मनसेने मुंबई, ठाणे, नाशिकसह इतर शहरात इंग्रजी पाट्या हटवल्या. याविषयावर राज्य सरकारच्या बोटचेप्या भूमिकेकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. हे सरकार अनेक मुद्यांवर केवळ तोंडच वाजवत असल्याचा टोला त्यांनी हाणला. बाळासाहेबांचे विचार बोलायचे मात्र मराठीबद्दल काही करायचं नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

मग कारवाई का करत नाही

बाळासाहेबांचे विचार विचार म्हणतात आणि मग कारवाई का करत नाहीत, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शिंदे सरकारचा नाही का असं म्हणत सारखे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार म्हणता मग कारवाई का करत नाही, असा हल्लाबोल केला. शासनाची धाक नावाची काही गोष्ट आहे की नाही, सवाल पण त्यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना 24 तास मोकळीक द्या

वाढलेली गुंडगिरी, ड्रग्जप्रकरणात पोलिसांना 24 तास मोकळीक द्या, ते सर्व मोडीत काढतील असं राज ठाकरे यांनी म्हणाले. यामागे कोण आहे. पैसा येतो कुठून याविषयी त्यांनी सवाल केला. पाषाण भागात मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील प्रश्न विचारले असता उत्तर न देताच ते निघून गेले.

मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई शहरात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली होती. ही मुदत संपली आहे. त्याअनुषंगाने महापालिका दंडात्मक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केल्याने आता मनसेचे खळखट्याक पुन्हा सुरु होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.