देशाचे कृषी मंत्री कोण हो… तोमर, तो मर..?; छगन भुजबळ यांची जीभ घसरली

फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेली. एअर बसचा प्रकल्पही गुजरातला गेला. मागच्या वर्षी 31 ऑक्टोबरला मी टाटाना पत्र दिले होते. तुम्ही हा प्रकल्प इथे आणा म्हणून त्यांना आवाहन केलं.

देशाचे कृषी मंत्री कोण हो... तोमर, तो मर..?; छगन भुजबळ यांची जीभ घसरली
देशाचे कृषी मंत्री कोण हो... तोमर, तो मर...; छगन भुजबळ यांची जीभ घसरलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 1:49 PM

नाशिक: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची नाशिक येथील एका कार्यक्रमात जीभ घसरली. देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याबद्दल उल्लेख करताना तो मर… असा उल्लेख भुजबळ यांनी केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्हाला तर देशाचे कृषी मंत्री शरद पवारच (sharad pawar) आहेत, असं आजही वाटतं, असंही ते म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची खिल्लीही उडवली.

स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड)चा 40वा गळीत हंगाम शुभारंभ सुरू झाला. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केलं. कृषी मंत्री कोण आपले… अब्दुल सत्तार… ते जिल्हाधिकाऱ्याला म्हणाले तू दारू पितो का? बरं देशाचे कृषी मंत्री कोण आहेत हो… (तोमर तोमर, लोकांमधून आवाज) तोमर… तो मर…मला माहीत नाही. तो मर… तो मर… अजूनही आम्हाला वाटतं शरद पवार साहेबच कृषी मंत्री आहेत, असं भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कुणाचाही अडचण असली की चला पवार साहेबांकडे. मग ऊस उत्पादक शेतकरी असो की इतर शेतकरी. सर्वजण पवारांकडे समस्या घेऊन येतात. पवार साहेबही या समस्या मार्गी लावतात. दिल्लीत जाऊन प्रश्न सोडवतात. दिल्लीत पवारांना कुणीही नकार देत नाही. राज्यच नव्हे तर देशाला पवारांची मोठी देणगी आहे, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं.

राजकारण आपल्या आपल्या ठिकाणी. निवडणुका येतील तेव्हा आपआपले झेंडे काढू. तोपर्यंत आपला झेंडा विकासाचा असला पाहिजे. शेतकरी आणि जनतेला त्रास होता कामा नये, असं आवाहनही भुजबळ यांनी मंचावरील उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांना केलं.

पूर्वी दादा भुसे काम करायचे कारण ते कृषी मंत्री होते. आता कोणतं ‘बंदर’ खातं दिल आहे. अरे कोणतं ‘बंदर’, असा टोलाही त्यांनी लगावला.

फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेली. एअर बसचा प्रकल्पही गुजरातला गेला. मागच्या वर्षी 31 ऑक्टोबरला मी टाटाना पत्र दिले होते. तुम्ही हा प्रकल्प इथे आणा म्हणून त्यांना आवाहन केलं. तेव्हाचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी देखील अनेक मीटिंग घेतल्या. अनेक प्रयत्न करूनही प्रकल्प गेला. आमच्या मुलांनी काम नाही करायचं तर काय हनुमान चालीसा वाचा, दहीहंडी फोडा एवढंच करायचं का? काही वेळेस मुख्यमंत्र्यांच्या शक्ती पेक्षा मोठ्या शक्ती असतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.