श्श्श्श… खतरनाक आयलंड, इथे 1.60 लोक जिवंत जाळले गेले; जे रहस्य जाणून घेण्यासाठी गेले, ते कधीच परत आले नाही!

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 29, 2022 | 9:37 AM

या ठिकाणी कोणी मासेमारीही करत नाही. कारण मासेमारी करण्यासाठी गेल्यास जाळ्यांमध्ये माश्यांऐवजी मानवी हाडेच येतात.

श्श्श्श... खतरनाक आयलंड, इथे 1.60 लोक जिवंत जाळले गेले; जे रहस्य जाणून घेण्यासाठी गेले, ते कधीच परत आले नाही!
श्श्श्श... खतरनाक आयलंड, इथे 1.60 लोक जिवंत जाळले गेले
Image Credit source: tv9 marathi

रोम: जगभरात अनेक सुंदर आणि निसर्ग संपन्न असे आयलंड (Island) आहेत. या बेटांवर वर्षातील 365 दिवस नेहमीच वर्दळ असते. पर्यटक (tourist) या आयलंडला सातत्याने भेट देत असतात. मात्र, या पृथ्वीर एक असं आयलंड आहे, जिथे इच्छा असूनही पर्यटकच काय त्या देशातील लोकही जात नाहीत. कारण हे आयलंड खतरनाक असल्याचं त्या देशाने मान्य केलं आहे. या आयलंडवर नेहमी अघटीत घडत असतं. जो व्यक्ती इथे जातो, तो कधीच परत येत नाही. इटलीच्या पोवेग्लिया (Poveglia Island) येथे हे आयलंड असून इटालियन सरकारने या आयलंडवर जाण्यावर बंदी घातलेली आहे.

पोवेग्लिया आयलंडला आयलंड ऑफ डेथ म्हणूनही ओळखलं जातं. इटलीच्या व्हेनिस आणि लिडो शहराच्या मध्ये व्हेनेटियन खाडीवर आहे. या दोन्ही शहराच्या मधून एक छोटासा झरा वाहतो. कधी काळी पर्यटकांचं ही फिरण्यासाठी पहिली पसंत होती. हजारो पर्यटक या बेटावर यायचे.

मात्र, सध्या या आयलंडवर जाण्यास कुणालाही परवानगी नाही. या आयलंडवरील रहस्य उलगडण्यासाठी अनेकजण तिकडे गेले. पण कोणीच परतला नाही. 16 व्या शतकात इटलीत प्लेगची साथ आली होती. त्यामुळे अनेक लोक प्लेगमुळे मृत्यूमुखी पडत होते. काही लोक मरायला टेकले होते. संपूर्ण युरोपात प्लेगचा सर्वाधिक परिणाम इटलीत झाला होता.

एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराची लागण होत असल्याने लोक आजारी पडत होते. त्यामुळेच इटली सरकारने प्लेगमुळे आजारी पडलेल्यांना पोवेग्लिया आयलंडवर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता. हे आयसोलेटेड आयलंड होतं. त्यामुळे प्लेगच्या रुग्णांना या ठिकाणी क्वॉरंटाईन केलं होतं. एवढेच नव्हे तर प्लेगमुळे मृत्यू झालेल्यांना याच ठिकाणी दफन केलं जात होतं.

हळूहळून या बेटावर सर्व रुग्णच राहू लागले. लाखो रुग्ण या ठिकाणी राहत होते. विशेष म्हणजे या आजारी लोकांना फक्त 40 दिवसच या ठिकाणी ठेवलं जात होतं. मात्र, परिस्थिती इतकी वाईट होती की, ज्याला या ठिकाणी आणलं त्याला परत घरी जाण्याची संधीच मिळत नव्हती.

इतिहासकारांच्या मते, या ठिकाणी 1 लाख 60 हजार लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. रुग्णसंख्या कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. प्लेगनंतर इटलीला पुन्हा एकदा काळ्या तापाने घेरलं होतं. या काळ्या तापावर काहीच उपचार नव्हते. या तापामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. या आजारामुळे मरणाऱ्यांचे मृतदेह या आयलंडवर आणून तसेच टाकून दिले जात होते. त्यावर अंत्यसंस्कारही केले जात नव्हते. त्यामुळे या आयलंडबाबतच्या अनेक दंतकथा पसरल्या आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

1922 मध्ये या आयलंडवर एक मेंटल हॉस्पिटलही तयार करण्यात आलं होतं. मात्र, नंतर या आयलंडवर भूताखेतांचा वावर असल्याचा दावा केला जाऊ लागला. रुग्णालयातील स्टाफ आणि रुग्णांनी त्यांना आत्मा आणि भूतप्रेत दिसल्याचा दावा केला होता. त्यामुळे हा आयलंड खतरनाक असल्याचं सांगितलं जावू लागलं.

रात्रीच्या वेळी या आयलंडवर जिवंत लोक कोण आणि मृत्यूमुखी पडलेले कोण यातील फरक ओळखणे कठीण होत असल्याचं सांगितलं जावू लागलं. रात्रीच्यावेळी या ठिकाणी विचित्र आणि भीतीदायक आवाज ऐकायला मिळत असल्याचं येथील डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यामुळे ही दहशत आणखीन वाढत गेली.

शिवाय या ठिकाणी डॉक्टरांचाही अचानक मृत्यू होऊ लागला. रुग्णांचाही गूढरित्या मृत्यू होऊ लागला. त्यामुळे हे मेंटल हॉस्पिटल बंद करण्यात आलं. या ठिकाणी कोणी मासेमारीही करत नाही. कारण मासेमारी करण्यासाठी गेल्यास जाळ्यांमध्ये माश्यांऐवजी मानवी हाडेच येतात.

या ठिकाणी असलेलं रहस्य उलगडण्यासाटी अनेक लोक या आयलंडवर जावू लागले. पण त्यातील बहुतेक लोक परत आलेच नाही. काही मोजकेच लोक परत आले. त्यांनी हे आयलंड पृथ्वीवरील नर्क असल्याचं सांगितलं. त्यामुळे या आयलंडवर कुणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जगातील हॉन्टेड प्लेसमधील यादीत हे आयलंड तिसऱ्या नंबरवर आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI