गिरीश महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलं; नाथाभाऊ यांचा धक्कादायक आरोप

| Updated on: Jul 02, 2023 | 7:10 AM

पंकजाताईंच्या वक्तव्यामुळे मात्र त्यांच्या भागात राजकीय उलथापालत होणार असल्याचा अंदाज पंकजाताईंनी वर्तवला होता. मात्र त्यांचा पक्ष सहमत व्हावा अशा स्वरूपाची त्यांची भूमिका असावी.

गिरीश महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलं; नाथाभाऊ यांचा धक्कादायक आरोप
eknath khadse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाजन यांची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या खडसे यांनी आता महाजन यांच्यावर अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा किंवा खान्देशातीलच नव्हे तर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलं असल्याचा धक्कादायक आरोप नाथाभाऊंनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण खान्देशात नाथाभाऊंच्या आरोपांची चर्चा रंगली आहे.

गिरीश महाजन यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. स्वत: महाजनांवर मोक्का लागलेला आहे. ते जामिनावर सुटलेले आहेत. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलेलं आहे. फक्त ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

गुटखा किंग महाजनाच्या जवळचा?

पुण्यात गुटखा किंगवर कारवाई करण्यात आली. तो गिरीश महाजनांच्या अत्यंत जवळचा आहे. महाजनांच्या आशीर्वादानेच तो गुटखा विकायचा का? मागच्या कालखंडात नाशिकमध्ये एकावर मोक्का लावण्यात आला होता. तोही महाजन यांच्या अत्यंत जवळचा होता. तो महाजन यांच्या गाडीमध्ये जवळ जाऊन बसायचा. त्यामुळे गिरीश महाजनांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक आहेत हे दिसून येतं, असं खडसे म्हणाले.

पंकजाच्या भूमिकेने उलथापालथ होणार

एकनाथ खडसे यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी माझी भूमिका घेतली आहे, असं पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली हे त्यांनाच माहिती, असं खडसे यांनी म्हटलं आहे. पंकजाताईंच्या वक्तव्यामुळे मात्र त्यांच्या भागात राजकीय उलथापालत होणार असल्याचा अंदाज पंकजाताईंनी वर्तवला होता. मात्र त्यांचा पक्ष सहमत व्हावा अशा स्वरूपाची त्यांची भूमिका असावी. पंकजाताईंनी गेल्या काळात जे काही वक्तव्य केले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचे वक्तव्य दिशा देणारे आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.

समृद्धी महामार्गावर 900 अपघात

दरम्यान, बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे झालेल्या अपघातावरही त्यांनी शोक व्यक्त केला. हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर 900च्या वर लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट, स्वप्नांचा प्रकल्प आहे. पण या प्रोजेक्टमुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले अशी आजची परिस्थिती आहे. समृद्धी महामार्गामध्ये काहीतरी त्रुटी आहे. काहीतरी चुकतंय. समृद्धी महामार्गावर अटी, शर्ती, नियमाचे पालन होत नाही. अति घाईमुळे हे पालन होताना दिसत नाह, असं ते म्हणाले.