माझ्या नादाला लागलात तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन : गणेश नाईक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

ठाणे: माझ्या नादाला लागलात तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन, असा धमकी वजा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विरोधकांना दिला. ठाण्यात आघाडीच्या महामेळाव्याच्यानिमित्ताने ते बोलत होते. महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश नाईक यांनी […]

माझ्या नादाला लागलात तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन : गणेश नाईक
Follow us on

ठाणे: माझ्या नादाला लागलात तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन, असा धमकी वजा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विरोधकांना दिला. ठाण्यात आघाडीच्या महामेळाव्याच्यानिमित्ताने ते बोलत होते.

महाआघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश नाईक यांनी विरोधकांना खरमरीत इशारा दिला.

याच प्रचारा मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली. शिवाय आनंद परांजपे यांना विजयी करण्या आवाहन केलं.

या मेळाव्याला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्यासह आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

ठाण्यातील लढत

ठाण्यात राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यात लढत होत आहे. मागील 2014 च्या निवडणुकीत राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा पुन्हा राजन विचारे आनंद परांजपेंचा पराभव करणार की परांजपे पराभवाचा वचपा काढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ठाण लोकसभा क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांचं समीकरण

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीचं प्राबल्य आहे.

बेलापुर – मंदाताई म्हात्रे, भाजप

ऐरोली – संदीप गणेश नाईक, राष्ट्रवादी

ठाणे – संजय केळकर, भाजप

ओवला माजीवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना

कोपरी पांचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना

मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता, भाजप

संबंधित बातम्या

युती, आघाडी आणि बहुजन वंचित आघाडी, कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी?  

यावेळी लोक गद्दारांना धडा शिकवतील, राजन विचारेंचा आनंद परांजपेंवर हल्लाबोल  

शिवसेनेच्या पहिल्या यादीत एका विद्यमान खासदाराला डच्चू