आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

| Updated on: Jun 14, 2019 | 3:30 PM

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत."

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना
Follow us on

सातारा : साताऱ्यात पाणीप्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. आधी माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी रामराजे नाईक-निंबाळकरांवर जहरी टीका केल्यानंतर, आता रामराजेंनी भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.

“जिल्ह्यात जोपर्यंत तीन पिसाळलेली कुत्री आहेत, तोपर्यंत माझी भूमिका सुद्धा पिसाळलेलीच असेल.” असे म्हणत रामराजेंनी उदयनराजे, रणजितसिंह आणि जयकुमार गोरेंवर निशाणा साधला आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर विरुद्ध उदयनराजे भोसले हा वाद जुना आहे. तसेच, आता लोकसभा निवडणुकीत माढ्यातून विजयी झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर घणाघाती टीका केली होती.

रणजितसिंहानी काय टीका केली होती?

“मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन.” अशी खालच्या पातळीवरील टीका नवनिर्वाचित खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळाकरांनी केली होती.

तसेच, “रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं” असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह