“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”

फलटण (सातारा) : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. “माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”, असं वादग्रस्त वक्तव्य नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून तब्बल 85 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांच्या फलटण येथे विजयीसभेचे आयोजन […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

May 26, 2019 | 11:51 AM

फलटण (सातारा) : सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जीभ घसरली आहे. “माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”, असं वादग्रस्त वक्तव्य नवनिर्वाचित भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून तब्बल 85 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांच्या फलटण येथे विजयीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली. मात्र टीका करताना त्यांची जीभ घसरली.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर?

“मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन.” अशी खालच्या पातळीवरील टीका नवनिर्वाचित खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळाकरांनी केली.

तसेच, “रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं” असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयमामा शिंदे यांचा पराभव करुन, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढ्याचा मतदारसंघ प्रचंड गाजला. याचे कारण देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी माढ्याच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर माढ्याची प्रचंड चर्चा झाली. त्यात माढ्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला उघडपणे मदत केली, तर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.

अखेर 223 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि माढ्यातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें