मोठी राजकीय घडामोड, शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट; नागपूर दौऱ्यात चर्चा काय?

शरद पवार हे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. तिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. या भेटीत दोन मोठ्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मोठी राजकीय घडामोड, शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट; नागपूर दौऱ्यात चर्चा काय?
| Edited By: | Updated on: Apr 01, 2023 | 3:00 PM

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्या ते मध्य प्रदेशातील शिवनी येथे होणाऱ्या आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांनी विमानतळावरून वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. तिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. या भेटीत दोन मोठ्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नितीन गडकरी यांच्या घरी ही बैठक पार पडली. शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शरद पवार यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे नेते आशिष देशमुखही याठिकाणी उपस्थित आहेत. वसंतदादा इंस्टिट्यूटसाठी नागपूर येथे जागा घेण्यात आली. त्यासंदर्भात चर्चा होऊ शकते.

या विषयांवर चर्चेची शक्यता

राजकारणातले हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यासंदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. शिवाय महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा होऊ शकते.

शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन्ही नेते साखर आणि ऊसाच्या क्षेत्रात काम करतात. त्यामुळे विदर्भातील ऊस कारखानदारीबाबत महत्वाची चर्चा होऊ शकते. हे दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत. ही सदिच्छा भेटही राहू शकते.

ऊस उत्पादकांशी साधला संवाद

शरद पवार यांचा हा दौरा ऊसाच्या कारखानदारीबाबत जास्त आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. साखर कारखानदारीमागच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यावेळी म्हणाले, जगात ब्राझील ऊसाच्या धंद्यात पहिल्या नंबरवर आहे. दुसरा नंबर भारताचा आहे. यंदा ब्राझीलमध्ये दुष्काळामुळे साखरेचं उत्पादन घटलं आणि भारत पहिल्या नंबरवर आलाय.

साखर, वीज, इथेनॅाल ऊसापासून होऊ शकते. महाराष्ट्रात मराठवाडा ऊस उत्पादनात पुढे चाललाय. नितीन गडकरी यांची मनापासून इच्छा आहे की विदर्भात साखर कारखानदारी वाढवावी. नितीन गडकरी यांनी बंद पडलेले कारखाने घेतले आणि सुरु केलेत. त्यांनी उत्तम ऊसाची लागवड केलीय. पाणी आणि जमीन उत्तम आहे. ही जमीन आणि पाणी बघीतल्यावर याठिकाणी चांगले उत्पादन होऊ शकते, असंही शरद पवार म्हणाले.