अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, विस्तार, राऊतांची अटक, अधिवेशन, कोर्ट कचेऱ्या, चर्चा नेमकी कशावर?

| Updated on: Aug 10, 2022 | 8:47 PM

अनेक मोठ्या घडामोडी घडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, विस्तार, राऊतांची अटक, अधिवेशन, कोर्ट कचेऱ्या, चर्चा नेमकी कशावर?
अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठकारेच्या भेटीला, विस्तार, राऊतांची अटक, अधिवेशन, कोर्ट कचेऱ्या, चर्चा नेमकी कशावर?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणातला मागचा महिना हा प्रचंड वादळी राहिलेला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे (Cm Ekanth Shinde) आणि भाजप युतीचं नवं सरकार तयार झालं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात फार काही हालचाली दिसत नव्हत्या. राष्ट्रवादीचे बरेच नेते हे संजय राऊतांच्या (Sanjay Raut) अटकेवरही मौनात दिसून आले. मात्र आता सत्तांतर त्यानंतर झालेला मंत्रिमंडळ विस्तार आणि गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली संजय राऊत यांची अटक अशा अनेक मोठ्या घडामोडी घडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे मातोश्री निवास्थानच्या बैठकतीत नेमकी खलबलं काय? असा सवाल राज्याच्या राजकारणात उपस्थित होणं सहाजिकच आहे.

राष्ट्रवादीचे कोणते नेते भेटीसाठी

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मातोश्री येथे दाखल झाले आहेत. ही एक सदिच्छ भेट असल्याचे सांगितले गेले असले तरीही नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच भेट होत आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि नवीन सरकार मधील अंतर्गत वाद-विवाद या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होते आहे.

कोणत्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अनेक निर्णय जात आहेत. त्याचं सर्वात मोठा कारण म्हणजे दोन तृतीयांश आमदारांची संख्या ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात हे सुरू आहे. सुप्रीम कोर्टातल्या या वादावरती या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि येणारे अधिवेशन याबाबत ही या बैठकीत खलबत्तं होऊ शकतात. तसेच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत हे सध्या ईडी कोठडी मुक्कामी आहेत. संजय राऊत यांना अटक झाल्यापासून शरद पवार यांची ही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यानंतर आज या बैठकीत राहतांबद्दल ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.