Sanjay Rathod : “चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा, टीका थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू” बंजारा समाजाचा इशारा

दुसरीकडे बंजारा समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. 

Sanjay Rathod : चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा, टीका थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू बंजारा समाजाचा इशारा
क्लीन चिट मिळाल्यानेच मंत्रिपदाची संधी, यापुढे काहीही बोलल्यास कायदेशीर पाऊल उचलणार, संजय राठोडांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे

|

Aug 10, 2022 | 8:12 PM

वाशिम : मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतरही विरोधक आणि सत्ताधारी (Cm Eknath Shinde) यांच्यातले टीकेचे बाण सध्या सुरूच आहेत. यात भर म्हणून मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश झाल्यानं भाजप नेत्या चित्र वाघ यांनीच सडकून टीका करत आपल्याच सरकारला घराचा आहेर दिला. त्यानंतर आता चित्र वाघ यांच्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. संजय राठोड यांनीही विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. मी कायदेशीररित्या क्लीन चिट मिळाल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे यापुढे या प्रकरणावर कोण काहीही बोललं तर थेट कायदेशील पाऊल उचललं जाईल, असे ते म्हणालेत, तर दुसरीकडे बंजारा समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असेही आवाहन त्यांनी केलंय.

भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना भेटणार

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिपदाची काल शपथ घेतली, त्यामुळे बंजारा न्याय दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तर आज महाआरती करून दिवाळी सण साजरा केला. संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. संजय राठोड यांच्यावर जी टीका होत आहे ती त्यांच्यावरील टीका नसून देशभरातील 12 कोटी बंजारा समाजावर होत आहे. भाजपवर आम्ही काही बोलणार नाही, चित्रा वाघ यांनी जे आरोप केलेत त्याबद्दल भाजपच्या वरीष्ठ नेत्या भेटून बोलणार आहे. , असेही बंजारा समाजाचे महंत यावेळी म्हणाले.

तर बंजारा समाज रस्त्यावर उतरेल

तसेच दोन दिवसात राठोड यांच्यावरील टीका थांबली नाही तर दोन दिवसात बांजरा समज रस्त्यावर उतरले. कालचा दिवस बंजारा समाजासाठी खूप आनंदाचा दिवस होता. कारण काल बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र काल भाजप नेत्यांनी जे संजय राठोड यांच्यावर जे आरोप केले ते संपूर्णतः खोटे आहेत. याचा संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो. जर दोन दिवसात आरोप बंद नाही झाले तर आम्ही इथून आदेश काढू, असा कडकडीत इशाराच त्यांनी दिला आहे.

संजय राठोडांना राखी बांधा

तसेच चित्रा वाघ तुम्ही बुद्धिमान असाल तर उद्या रक्षाबंधन आहे. उद्या जाऊन संजय राठोड यांच्या हाताला राखी बांधा. बंजारा समाज तुम्हाला माफ करेल आणि चित्रा वाघ शांत झाल्या तर हे थांबेल नाहीतर उद्रेक होईल, आमच्या नेत्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा या पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें