धनंजय मुंडेंनी दावा केलेल्या जागांवर राष्ट्रवादीचा जवळपास पराभव

| Updated on: May 23, 2019 | 2:43 PM

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 2.30 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 4 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही […]

धनंजय मुंडेंनी दावा केलेल्या जागांवर राष्ट्रवादीचा जवळपास पराभव
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. कल आलेत त्याप्रमाणे निकाल आल्यास 2014 च्या विजयापेक्षाही जास्त मोठा हा विजय असेल. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजपने अभूतपूर्व असं यश मिळवलंय. 2.30 वाजेपर्यंत काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एका जागेवर किरकोळ आघाडी होती. तर राष्ट्रवादी 4 आणि एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळालेली नाहीत. महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसची हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी छातीठोकपणे विजयाचा दावा केलेल्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव होताना दिसतोय.

एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत. पण एक्झिट पोल नेहमीच खरे ठरत नाहीत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. शिवाय एनडीएला 200 च्या वर जागा मिळणार नाहीत. राज्यात राष्ट्रवादीला 13 ते 16 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला होता. विशेष म्हणजे बीड, मावळ, शिरुर, बारामती आणि उस्मानाबाद या ठिकाणी राष्ट्रवादीचाच विजय होईल, असंही ते म्हणाले होते.

बीडमध्ये धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी स्वतःच्या विश्वासातल्या उमेदवाराला बीडमध्ये उमेदवारी दिली. बीडमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळणार असल्याचा धनंजय मुंडेंना विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला होता. पण भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पहिल्या फेरीपासूनच विक्रमी आघाडी घेतली. 21 व्या फेरीअखेर त्या 92 हजार 248 मतांनी आघाडीवर होत्या. 21 व्या फेरीपर्यंत त्यांना 387591 आणि बजरंग सोनवणे यांना 295343 मतं मिळाली होती.

संबंधित बातमी :

महाराष्ट्रासह या 10 राज्यात काँग्रेसचा सुपडासाफ, राहुल गांधींसह दिग्गज पिछाडीवर

राष्ट्रवादीचा दोन जागांवर विजय, महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी