आम्ही बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागा जिंकू : धनंजय मुंडे

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 13-16 जागा मिळतील. यामध्ये बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलाय. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असतानाही निकालाचा अंदाज चुकला होता, एक्झिट पोलचा कल खरा ठरला तर  आम्हाला प्रचारात सरकारविरोधी जो राग दिसला तो कुठे गेला? यामुळे ईव्हीएम …

आम्ही बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागा जिंकू : धनंजय मुंडे

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 13-16 जागा मिळतील. यामध्ये बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागांवर विजय निश्चित असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलाय. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असतानाही निकालाचा अंदाज चुकला होता, एक्झिट पोलचा कल खरा ठरला तर  आम्हाला प्रचारात सरकारविरोधी जो राग दिसला तो कुठे गेला? यामुळे ईव्हीएम आणि इतर यंत्रणेवर संशय करायला जागा आहे, असंही ते म्हणाले.

एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत. पण एक्झिट पोल नेहमीच खरे ठरत नाहीत, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. एनडीएला 200 च्या वर जागा मिळणार नाहीत. राज्यात राष्ट्रवादीला 13 ते 16 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.

बीडमध्ये धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी स्वतःच्या विश्वासातल्या उमेदवाराला बीडमध्ये उमेदवारी दिली. बीडमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळणार असल्याचा धनंजय मुंडेंना विश्वास आहे. त्यांनी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. पालकमंत्री मुस्लीम मतदार असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राची माहिती का घेत आहेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय.

टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटरचा एक्झिट पोल

‘टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर’ यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे. देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज  Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

व्हिडीओ पाहा :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *