राजकीय मतभेद, व्यक्तीगत पातळीवर सहकार्य, रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा

| Updated on: Jan 23, 2020 | 3:59 PM

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन नव्याने राजकारणात एण्ट्री केलेल्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा (Rohit Pawar Wish Amit Thackeray) दिल्या आहेत.

राजकीय मतभेद, व्यक्तीगत पातळीवर सहकार्य, रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा
Follow us on

मुंबई : शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन नव्याने राजकारणात एण्ट्री केलेल्या अमित ठाकरे यांना शुभेच्छा (Rohit Pawar Wish Amit Thackeray) दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज (23 जानेवारी) गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात (Rohit Pawar Wish Amit Thackeray) आली.

अमित ठाकरे आता सक्रीय राजकारणात उतरणार असल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अमित यांच्या एण्ट्रीने मनसेमधील तरुण वर्गातही उत्सुकता दिसत आहे.

रोहित पवारांकडून ट्विटरवरुन शुभेच्छा

“महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील”, असं रोहित पवार म्हणाले.

मनसेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच पक्षाचं अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तसेच या अधिवेशनात राज ठाकरेंनी अमितच्या व्यतिरिक्त पक्षाच्या नव्या झेंड्याचेही अनावरण केले. त्यामुळे राज ठाकरे हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, यापूर्वीही रोहित पवार आणि अमित ठाकरे या दोघांची लोअर परळ येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीमुळेही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाचं केंद्रबिंदू असलेलं घराणं पवार आणि ठाकरे आहेत. याच घराण्यातील युवा पिढी आता नव्या दमान राजकारणात सक्रीय झालेली पाहायला मिळत आहे.