Sharad Pawar Corona Vaccine | जागतिक आरोग्य दिनाचा योग, शरद पवारांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस

| Updated on: Apr 07, 2021 | 10:39 AM

साधारण महिनाभरानंतर शरद पवारांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. (Sharad Pawar COVID-19 vaccine second dose)

Sharad Pawar Corona Vaccine | जागतिक आरोग्य दिनाचा योग, शरद पवारांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस
शरद पवारांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांनी कोरोनाची दुसरी लस घेतली. साधारण महिनाभरानंतर शरद पवारांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी घरीच कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP President Sharad Pawar takes COVID-19 vaccine second dose)

शरद पवारांचे ट्वीट

“आज सकाळी कोविड-19 लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

शरद पवारांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेतली लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी 1 मार्च सोमवारी कोरोनाची लसीचा (Covid 19 Vaccine) पहिला डोस घेतला होती. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली होती. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पोटदुखीचा त्रास झाला होता. यानंतर 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. अखेर, आराम वाटू लागल्याने शनिवारी 3 एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह ते सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी परतले होते.

बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढ

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार होते. या पार्श्वभूमीवर त्यांना घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

पुन्हा शस्त्रक्रिया होणार

15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. (NCP President Sharad Pawar takes COVID-19 vaccine second dose)

संबंधित बातम्या :

शरद पवारांना डिस्चार्ज; सक्तीच्या आरामाचा डॉक्टरांचा सल्ला

‘पवारसाहेबांच्या’ प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात, मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा