Eknath Shinde : दसरा मेळाव्याच्या प्रश्नाला बगल, मुख्यमंत्र्यांनी सांगितली स्वत:च्या कामाची ‘स्टाईल’..!

| Updated on: Aug 27, 2022 | 10:53 PM

सध्या राज्यात दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान मिळणार की नाही, यावरुन राजकारण सुरु झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री काय म्हणणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना याबाबत एकवेळेस नाहीतर तीन वेळेस प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली होती.

Eknath Shinde : दसरा मेळाव्याच्या प्रश्नाला बगल, मुख्यमंत्र्यांनी सांगितली स्वत:च्या कामाची स्टाईल..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Image Credit source: social
Follow us on

सातारा : राज्यात सध्या (Shivsena Party) शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळणार की नाही यावरुन राजकारण पेटले आहे. शिवसेनेने याबाबत मुंबई महापालिकेकडे रीतसर अर्जही केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाचा (Dussehra Rally) दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही किंवा झाला तरी तो शिंदे गटाचा कि शिवसेनेचा अशा अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर बोलणे टाळले आहे. शिवाय आणखी दसरा लांब असल्याचे सांगत पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली आहे. तर दुसरीकडे आपल्या कामाचा अंदाज हा सर्वसामान्यांना भावत असल्यानेच ऑन दी स्पॉट सोल्युशनवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. काल चांदणी चौकात झालेली वाहतूक कोंडी आणि त्यावर त्यांनी काढलेला तोडगा हा चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे हीच आपल्या कामाची पद्धत असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

तीन वेळा प्रश्न, एक वेळेस उत्तर

सध्या राज्यात दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्कचे मैदान मिळणार की नाही, यावरुन राजकारण सुरु झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री काय म्हणणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना याबाबत एकवेळेस नाहीतर तीन वेळेस प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली होती. अखेर दसऱ्याला आणखी वेळ आहे. त्याबद्दल वेळेनुसार निर्णय घेऊ असे म्हणत नेमके काय होणार याबाबत हे सांगणे टाळले आहे. आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

बाळासाहेबांचे विचार पुसण्याचा प्रयत्न

एकीकडे आम्ही बाळासाहेबांचे विचार जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत दुसरीकडे कॉंग्रेस,राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांचे विचार पुसण्याचे काम सुरु असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता ठाकरेंवर केली आहे. तर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीबद्दलही त्यांनी अधिकचे मत न व्यक्त करता याबद्दल अनेकांची वेगवेगळी मते असल्याचे सांगितले. तर कोणी कोणाशी युती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. शिवाय आपल्या मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री हे जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचाही त्यांनी दावा केला. जनतेच्या कामाचे कंत्राट घेतल्याचे म्हणत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकी कशी कार्यपद्धती आहे मुख्यमंत्र्यांची?

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे लागलीच कामालाही लागले होते. त्यांनी मोबाईलद्वारेही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन कामे पूर्ण करुन घेतली आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ हे व्हायरल देखील झाले आहेत. त्यामुळे आपले काम हे बघतो, करतो, फाईल पाहतो असे नाही तर जनतेच्या समस्या जाणून घेऊन जागेवर तोडगा काढणे हे आहे. लोकांनी जी काम करण्याची संधी दिली आहे त्याचे पालन करीत आहे. जनतेने मला स्विकारल्यामुळेच आज रस्त्यावरही माझ्यासमोर समस्या मांडल्या जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.