…तोपर्यंत शेतकऱ्याकडून वसुली नको, आमदार तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्याला झापले

एकीकडे दुष्काळाने बळीराजाची स्थिती बिकट झाली असताना आता बँकेचे अधिकारी देखील शेतकऱ्यांना नाडत असल्याचे चित्र आहे. त्यात आता शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्यांना सज्जड दम दिल्याचे उघडकीस आले आहे.

...तोपर्यंत शेतकऱ्याकडून वसुली नको, आमदार तानाजी सावंत यांनी  बँक अधिकाऱ्याला झापले
Tanaji Sawant
| Updated on: Oct 29, 2026 | 8:09 PM

दुष्काळ संपेपर्यंत शेतकऱ्यांवरील वसुलीची कारवाई स्थगित करा असा दम देत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्याला झापले आहे. मला बँकिंग शिकवू नका, कायद्याचे धडेही देऊ नका. बँकिंग मलाही माहिती आहे, माझ्याकडे चार बँका आहेत असेही तानाजी सावंत यांनी या बँक अधिकाऱ्याला फोनवरुन बजावले आहे.

 

Loading...

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी एकीकडे राज्य सरकारने मदत योजना जाहीर केली आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेल्याचे जमा झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही बँकांमध्ये कर्जावरुन शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना देखील घडली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्याला फोनवरुन दम दिल्याची घटना घडली आहे.

शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्यांना दुष्काळ संपेपर्यंत शेतकऱ्यांकडून वसुली करु नये असा सज्जड दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही मला मला बँकिंग शिकवू नका, कायद्याचे धडेही देऊ नका, असेही आमदार तानाजी सावंत यांनी या बँक अधिकाऱ्याला झापले आहे.माझ्याही चार बँका आहेत. दुष्काळ संपल्यानंतरच वसुलीची कारवाई करा, तोपर्यंत कारवाई थांबवा असेही तानाजी सावंत यांनी बजावले आहे.

तुम्ही जर वसुलीसाठी आला तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असाही इशारा यावेळी आमदार तानाजी सावंत यांनी दिला आहे. शिवसैनिकांवर एफआयआर दाखल केल्यास आपण पाहून घेऊ असाही दम तानाजी सावंत यांनी या बँकेच्या अधिकाऱ्याला दिला आहे. कोर्टाची ऑर्डर वगैरे बाजूला ठेवा, आम्ही ते ऐकून घेत नाही,असेही तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्याला सुनावले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us