AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : वैभवने तिसऱ्या मॅचमध्ये 19 चेंडूत 45 धावा ठोकल्या पण 116 वनडे खेळलेला दिग्गज भारतीय क्रिकेटर म्हणतो सूर्यवंशीला बाहेर बसवा

IND vs NZ : वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या टी20 सामन्यात जबरदस्त सुरुवात केली. पण विजयाचं सर्वात जास्त श्रेय ओपनर अभिषेक शर्माला मिळालं. कारण त्याने दमदार शतकी खेळी केली. आता एका दिग्गज भारतीय क्रिकेटरने चौथ्या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीला बाहेर बसवा असं म्हटलं आहे.

IND vs NZ : वैभवने तिसऱ्या मॅचमध्ये 19 चेंडूत 45 धावा ठोकल्या पण 116 वनडे खेळलेला दिग्गज भारतीय क्रिकेटर म्हणतो सूर्यवंशीला बाहेर बसवा
vaibhav sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Oct 29, 2026 | 7:45 PM
Share

न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाने आधीच 3-0 अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 30 ऑक्टोंबरला ऑकलंडमध्ये चौथा सामना होणार आहे. टीम इंडियाने आधीच तीन सामने जिंकले आहेत. आता उर्वरित दोन सामने जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचं लक्ष्य आहे. आता चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याची चर्चा रंगली आहे. ईशान किशन पुनरागमन करणार का?. तो फिट झाला तर बाहेर कोणाला बसवणार?. माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बाहेर कोणाला बसवायचं या मुद्यावर थेट वैभव सूर्यवंशीचं नाव घेतलं.

ऑकलंडच्या ईडन पार्कवर होणाऱ्या मॅचआधी अश्विनने आपलं मत मांडलं. ईशान किशनचा प्लेइंग इलेवनमध्ये समावेश केला, तर वैभव सूर्यवंशीच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आणलं पाहिजे असं अश्विनच मत आहे. ईशानला पहिल्या टी20 मध्ये दुखापत झाली. त्यामुळे तो पुढचे दोन सामने खेळू शकला नाही. म्हणूनच वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली. दुसऱ्या टी20 मध्ये वैभव 3 नंबरला बॅटिंगला आलेला. पण त्याला विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही. तो स्वस्तात बाद झाला. पण चौथ्या सामन्यात त्याला ओपनिंगची संधी मिळाली.

तो संजूचा अधिकार

या सीरीजचं प्रसारण करणाऱ्या सोनी लिवर बोलताना अश्विनने या मुद्यावर वैभव सूर्यवंशीला ड्रॉप केलं पाहिजे असं म्हटलं. “या कॉम्बिनेशनमध्ये ईशान किशन नसताना सूर्यवंशी असेल तर परफेक्ट वाटतं. कारण संजूकडे 3 नंबरवर खेळण्याचा अनुभव आहे. उद्या ईशान टीममध्ये आला, तर मला वाटतं वैभवला बाहेर बसवलं जाईल. संजू ओपनिंगला येईल, तो त्याचा अधिकार आहे” असं अश्विनने म्हटलं.

तिसर्‍या सामन्यात ताकद दाखवून दिली

अश्विन स्पष्टपणे म्हणाला की, “मला वैभव कडून भरपूर अपेक्षा आहेत. तो काय करु शकतो हे त्याने दाखवून दिलय” “वैभव आता अवघा 15 वर्षांचा आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली त्याला स्वत:चा विकास करण्याची पुरेशी संधी मिळाली पाहिजे” असं अश्विनला वाटतं. वैभवच्या बाबतीत कुठलीही घाईगडबड करु नये तसचं गरजेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगू नका असं अश्विनचं सांगणं आहे. वैभवने दुसऱ्या टी20 मध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने फक्त 4 धावा केल्या. पण तिसऱ्या सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली. त्याने 19 चेंडूत 45 धावा चोपल्या.

Follow Us
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?