सीट मिळाल्याशिवाय समाधान नाही, मातोश्री भेटीनंतर खोतकरांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून अद्याप माघार घेतलेली नाही. अर्जुन खोतकर यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ते जालना मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं दिसलं. अर्जुन खोतकर यांनी सीट भेटल्याशिवाय समाधान नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने  खोतकर जालना लोकसभा सोडणार की नाही असा प्रश्न कायम राहिला आहे. दरम्यान, […]

सीट मिळाल्याशिवाय समाधान नाही, मातोश्री भेटीनंतर खोतकरांची प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून अद्याप माघार घेतलेली नाही. अर्जुन खोतकर यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ते जालना मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं दिसलं. अर्जुन खोतकर यांनी सीट भेटल्याशिवाय समाधान नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने  खोतकर जालना लोकसभा सोडणार की नाही असा प्रश्न कायम राहिला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. खोतकर म्हणाले, “जालन्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय होऊ शकतो. मी माझं म्हणणं उद्धव ठाकरेंकडे मांडलं. त्यांनी ते पूर्णपणे ऐकून घेतलं. उद्धव ठाकरे उद्या 11 पर्यंत निर्णय”

अर्जुन खोतकरांचे प्रस्ताव

दरम्यान, यावेळी आपण उद्धव ठाकरेंकडे अनेक प्रस्ताव मांडल्याचं खोतकरांनी सांगितलं. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंविरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीसाठी आपण तयार आहोत, असं खोतकर म्हणाले.

सीट मिळाल्याशिवाय समाधान नाही

अर्जुन खोतकर यांनी सीट भेटल्याशिवाय समाधान नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने  खोतकर जालना लोकसभा सोडणार की नाही असा प्रश्न कायम राहिला आहे.

उद्धव ठाकरेंनी माझे पूर्णपणे ऐकून घेतले. मला खूप वेळ दिला. जालना लोकसभा निवडणुकीसंदर्भात उद्या निर्णय होईल, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

खोतकर-सत्तार भेट

दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादेत काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती.  या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यातच दोन दिवसात खोतकरांबद्दल गुड न्यूज मिळेल, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला.

खोतकरांकडे समन्वयकाची जबाबदारी

अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठावाडा विभागाच्या समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, खोतकरांनी अद्याप माघार घेतलेली नाही.

संबंधित बातम्या

खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज, अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 

मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर  

“92 वर्षांचा असलो म्हणून काय झालं? पवारांनी आदेश द्यावा, दानवेंविरोधात लढेन”