
नाशिक : नॉट रिचेबल शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांची गाडी नाशिकच्या (Nashik) अंबडमध्ये सापडली आहे. काल रात्रीपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधान आलं आहे. नाशिक पोलिसांसह (Nashik police) इतर पथके त्याचा शोध घेत आहेत. त्यांची गाडी नाशिकच्या अंबड येथे सापडल्यापासून पोलिसांनी त्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
शुंभागी पाटील यांना ठाकरे गटाने पुरस्कृत केलं आहे. काल त्या उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नाशिककडे गेल्या, त्यानंतर त्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सुध्दा सतर्क झाली आहे. त्यावर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात. अर्ज मागे घेण्याच्या आगोदर उमेदवार गायब कसे होतात. ते कुठे राहतात आणि गायब होतात हा त्यांचा प्रश्न आहे यात खळबळजनक काहीचं नाही.
नाशिकच्या पदवीधर राजकारणात मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान उमेदवार शुभांगी पाटील अचानक गायब झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.