..तर आपण गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल, ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंना टोला

| Updated on: Jun 27, 2021 | 8:13 PM

प्रीतम मुंडेंच्या या टीकेला आता मंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना केंद्र सरकारकडून आरक्षण टिकवण्याचं आव्हान दिलं आहे. ते आज नांदेड दौऱ्यावर होते.

..तर आपण गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल, ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंना टोला
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे
Follow us on

नांदेड : ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण आता चांगलच रंगताना पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शनिवारी भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. त्यावेळी बीडमध्ये झालेल्या आंदोलनात खासदार प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. प्रीतम मुंडेंच्या या टीकेला आता मंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना केंद्र सरकारकडून आरक्षण टिकवण्याचं आव्हान दिलं आहे. ते आज नांदेड दौऱ्यावर होते. (OBC Reservation Dhananjay Munde responds to MP Pritam Munde’s criticism )

प्रीतम मुंडे यांनी बीडमधील चक्काजाम आंदोलनादरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. त्याला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्यु्त्तर दिलंय. केंद्रात भाजपचं सरकार आहे. प्रीतम मुंडे या सत्ताधारी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण केंद्र सरकारकडून टिकवावं असा सल्ला धनंजय मुंडे यांनी दिलाय. तसंच प्रीतम मुंडे यांनी तसं केलं तर खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्या चालवत आहात हे सिद्ध होईल, असा खोचक टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावलाय.

प्रीतम मुंडे काय म्हणाल्या होत्या?

‘ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यांत आहे का? असा सवाल करत भाजपच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. तसंच, सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला.

‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसींची राजकीय आरक्षण रद्द झाले. कोरोनातील कुठल्याही प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार काहीच देत नाही, असं राज्यातील सत्ताधारी बोलतात. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केलं नाही, ते केलं नाही. केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या, भाजपमध्ये मध्ये खूप खमके माणस आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालू शकतात, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

पटोले म्हणतात, फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्रात जाऊ, बावनकुळेंच्या दुखत्या नसीवरही बोट !

मी गोपीनाथ मुंडेंचा शिष्य, पंकजांना वडेट्टीवार म्हणतात, आपण गुरुबंधू, वाचा ओबीसी परिषदेत काय घडतंय?

OBC Reservation Dhananjay Munde responds to MP Pritam Munde’s criticism