Devendra Fadnavis | बॅनर नको की होर्डिंग नको, हार तूरे ठेवा बाजूला बर्थडे ओक्केमध्ये नाही, साधेपणाने साजरा करा, देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचे आवाहन

Devendra Fadnavis Birthday News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त राज्यात कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने याविषयीचे आवाहन समाज माध्यमांवर केले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

Devendra Fadnavis | बॅनर नको की होर्डिंग नको, हार तूरे ठेवा बाजूला बर्थडे ओक्केमध्ये नाही, साधेपणाने साजरा करा, देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्त भाजपचे आवाहन
वाढदिवशी बॅनर, होर्डिंग नको
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 18, 2022 | 1:03 PM

Devendra Fadnavis | राज्यात सत्तांतर घडवणारे बिन्नीचे शिलेदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस (Birthday) आहे. मी पुन्हा येईनचा नारा दिल्याच्या अडीच वर्षानंतर शिंदेसेना आणि भाजपचं संयुक्त सरकार राज्यात स्थापन झालं. सरकारने जोरदार बहुमत मिळवलं. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोरोनामुळे वाढदिवस आणि स्वागत समारंभांना राजकीय नेत्यांनी फाटा दिला होता. त्यात देवेंद्र फडणवीस आखाडीवर होते. आता कोरोनाचे मळभ दूर झाले आहे. त्यातच सत्ता ही हाती आली आहे. त्यामुळे मोक्का भी है, दस्तूर भी है असे म्हणत कार्यकर्त्यांना (Party Workers) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता. परंतू, भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janta Party) या निमित्तानं कार्यकर्त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा ही वाढदिवस 22 जुलै रोजीच असतो. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी ही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केलं होते.

काय केले आवाहन

भाजपने समाज माध्यमावर याविषयीचे आवाहन केले आहे. पक्षाने ट्विट (Twit)करत कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात, होर्डिंग, उत्सव साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. 22 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असून यानिमित्त पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रातून, टीव्ही माध्यमातून जाहिरातबाजी करणार नाहीत असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

तर गंभीर दखल

दरम्यान अतिउत्साही कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षाने या सूचनेचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याचा इशारा ही दिला आहे. होर्डिंग, बॅनर, जाहिराती असं कुणीही केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं भाजपानं म्हटलं आहे. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांना योगदान द्यायचं आहे त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावं, असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा

दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करायचे असल्याने राज्यातील आणि देशातील अनेक नेत्यांनी वाढदिवस साजन न करता योगदानाची रक्कम कोविड रुग्णालय, औषधी आणि उपचारांसाठी देणगी स्वरुपात दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गेल्या दोन तीन वर्षांपासून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा दिला आहे. गेल्या वर्षी ही पक्षातर्फे त्यांच्या वाढदिवशी होर्डिंग, बॅनर न लावण्याचे आवाहन करण्यात आले होते आणि वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता.