Pankaja Munde | आता पदर पसरणार नाही, मी क्षमाशील; पण समाज नाही, पंकजांच्या भाषणातही संघर्ष अन् ‘नाराजी’वर भर, वाचा 10 वक्तव्यं

| Updated on: Oct 05, 2022 | 3:02 PM

मी पदर पसरून कुणासमोर मागायला जाणार नाही. मी कुणाबद्दल बोलणार नाही. कुणा नेत्याबद्दल बोलणार नाही. तुम्हाला वाटतंय, मी दुर्गेचं रुप धारण करेन.. पण योग्य वेळी करेन, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय.

Pankaja Munde | आता पदर पसरणार नाही, मी क्षमाशील; पण समाज नाही, पंकजांच्या भाषणातही संघर्ष अन् नाराजीवर भर, वाचा 10 वक्तव्यं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः संघर्ष हा कुणाच्याही वाटेला चुकलेला नाही. त्यामुळे मी संघर्षाला घाबरत नाही. 2019 साली निवडणुकीत (Election) पडले. त्यानंतर अनेकदा संधी आली. चार आमदार, चार खासदार, पुन्हा चार आमदार झाले. पण मला संधी दिली नाही. मला पदाची इच्छा नाही. पण माझे कार्यकर्ते बोलतात. माझा समाज बोलतो. त्यांना मी उत्तर देऊ शकत नाही, अशी जाहीर खंत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आजच्या भाषणातून मांडली. महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार डावलले जाण्याची पंकजांच्या मनातील खदखद यावेळी भगवान भक्तीगडावरच्या (Bhagwan Bhakti Gad) भाषणातूनही दिसून आली. पण आता मी वाट पाहणार नाही, मी 2024  ची तयारी सुरु केली आहे, असा इशाराही पंकजांनी दिला… ज्या वक्तव्यांतून त्यांचा संघर्ष आणि नाराजी दिसून आली, अशी महत्त्वाची वक्तव्य पुढील प्रमाणे-

  •  व्यक्तीपेक्षा संघटन मोठं आहे, असं म्हणतात. मी हा नियम मानते.
  •  मीडिया, मी तुम्हाला हात जोडते. पुन्हा कोणत्याही आमदारांची यादी आली तर माझं नाव टाकू नका. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. पंकजा नाराज आहे, म्हणू नका. मी नाराज नाही…
  • मोठ्या-मोठ्या लोकांना संघर्ष करावा लागला आहे. तो संघर्ष तुमच्याही लेकीच्या वाट्याला आलाय. पचवा तो संघर्ष.. योग्य वेळेची वाट बघा..
  • तुम्ही याठिकाणी आलात ते कशासाठी? मी मंत्री, आमदार, खासदार, ग्रामसेवक सदस्यही नाही. मी तुम्हाला काय देते? स्वाभिमान देऊ शकते. फक्त.
  •  माना के औरों के मुकाबले कुछ पाया नही हमने
    पर खुद को गिरा कर कुछ उठाया नही हम ने…
  •  माझ्यावर निष्ठा असेल तर मला शोभेल असं वागा…
  •  2024 मध्ये परळीत पक्षाने तिकिट दिलं तर लढेन.
    जरूरत से ज्यादा इमानदार हूँ मै, इसलिए सब की नजरों मी गुनहगार हू मै..
  • माझं म्हणणंय थांबा. आपण जोरात तयारी करू. 2024 ला निवडणूक आहे. एकदा समर्पण करुन दाखवलंय…
  • एकदा 2024  च्या तयारीला लागा.. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र कसा बनतो, हे आपण दाखवू…
  • मी पदर पसरून कुणासमोर मागायला जाणार नाही. मी कुणाबद्दल बोलणार नाही. कुणा नेत्याबद्दल बोलणार नाही. तुम्हाला वाटतंय, मी दुर्गेचं रुप धारण करेन.. पण योग्य वेळी करेन.
  • जितना बदल सकते थे खुद को बदल दिया हमने, अब खुदको बदल दो… असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.