Parambir Singh letter : परमबीर सिंगांच्या पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?, फडणवीसांचा सवाल

| Updated on: Mar 20, 2021 | 7:51 PM

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पक्षात काही चॅट दिले आहेत. तो थेट पुरावाच आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

Parambir Singh letter : परमबीर सिंगांच्या पत्रात थेट पुरावा, मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी अजून काय हवं?, फडणवीसांचा सवाल
devendra fadnavis
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे पत्र केवळ खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पक्षात काही चॅट दिले आहेत. तो थेट पुरावाच आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.(Devendra Fadnavis demands resignation of Anil Deshmukh, criticizes Thackeray government after Parambir Singh’s letter)

अजून कुठला पुरावा हवा? – फडणवीस

परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात सिंग यांनी काही पुरावेही जोडले आहेत. त्यात विविध चॅटचा समावेश आहे. हे चॅट म्हणजेच मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्र्यांना अजून कुठला पुरावा हवा आहे? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. राज्यात जी प्रकरणं उघडकीस येत आहेत. त्यातून महाराष्ट्र पोलिसांचं खच्चीकरण सुरु आहे. हे अत्यंत वाईट असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

‘तात्काळ कारवाई व्हावी’

या पत्रानंतर गृहमंत्री यांनी तात्काळ पदावरुन बाजूला व्हायला हवं. त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरुन काढावं, अशी मागणी फडणवीस यांनी केलीय. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हायला हवा. हा महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारा हा विषय आहे. हा कुण्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने केलेला आरोप नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हायला हवी, अशी आक्रमक भूमिका फडणवीसांनी व्यक्त केलीय.

‘मुख्यमंत्री बोलतात ते त्यांनी करुन दाखवावं’

राज्य सरकारनं नैतिक भूमिका घेतली पाहिजे, मुख्यमंत्री जे बोलतात त्यांनी ते कृतीत उतरवायला हवं. परमबीर सिंग यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं आहे. असं असेल तर त्यावेळी कारवाई व्हायला हवी होती. तेव्हा या प्रकरणावरुन सरकारला धोका निर्माण होईल अशी भीती मुख्यमंत्र्यांना असावी. पण आता कुठल्याही परिस्थितीत कारवाई करायला हवी, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

Devendra Fadnavis demands resignation of Anil Deshmukh, criticizes Thackeray government after Parambir Singh’s letter