MP Rajeev Satav Death | राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला : पंतप्रधान मोदी

राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. (PM Modi On MP Rajeev Satav death)

MP Rajeev Satav Death | राजीव सातव हे उभरतं नेतृत्व, मी संसदेतील चांगला मित्र गमावला : पंतप्रधान मोदी
pm modi Rajeev Satav
| Updated on: May 16, 2021 | 12:20 PM

मुंबई : राजीव सातव हे उभरतं नेतृत्व होतं. त्यांच्या जाण्याने मी संसदेतील चांगला मित्र गमावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे आज (16 मे) कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. (PM Narendra Modi Comment On Congress MP Rajeev Satav death)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट

राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

23 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी (16 मे) सकाळी 5 वाजता  कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.

कोरोनाची लक्षणे 

19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

संबंधित बातम्या : 

Rajeev Satav Death | महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का बसलाय : शरद पवार

Rajeev Satav Death | गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचा विश्वासू मोहरा, कोण होते राजीव सातव?

MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी