आज अनेकांची झोप उडेल… मोदींचं एक फोटो शेअर करत मोठं विधान; उडाली खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. खोल समुद्रातील हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) द्वारे विकसित केले आहे

आज अनेकांची झोप उडेल... मोदींचं एक फोटो शेअर करत मोठं विधान; उडाली खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Image Credit source: social media
| Updated on: May 02, 2025 | 1:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनीही विरोधकांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सांगू इच्छितो की, तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार आहे,”असं म्हणत मोदींनी टोला हाणला.

यावेळी, मुख्यमंत्री विजयन यांच्याव्यतिरिक्त, काँग्रेस नेते शशी थरूर देखील व्यासपीठावर उपस्थित होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “शशी थरूर देखील स्टेजवर बसले आहेत, आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवून देईल. हा मेसेज जिथे पोहोचायचा होता, तिथपर्यंत पोहोचला देखील असेल”, असं म्हणत मोदींनी विरोधकांना चिमटा काढला.

विझिनजम बंदर सुरू झाल्यामुळे, केरळला जागतिक सागरी नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताच्या भूमिकेत एक गेम चेंजर ठरू शकते.

 

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाल्यावरही विमानतळावर शशी थरूर यांनी त्यांचे स्वागत केले होते. यावेळी थरूर एक ट्विटही केलं होतं. दिल्ली विमानतळावर विमानाला उशीर झाला तरी, पंतप्रधान मोदींचे त्यांच्या मतदारसंघात स्वागत करता यावे यासाठी (मी) वेळेतच तिरुअनंतपुरमला पोहोचलो, असे त्यांनी नमूद केलं होतं.

 

खोल समुद्रातील हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) द्वारे विकसित केले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप -PPP ) मॉडेल अंतर्गत सुमारे 8,867 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला. यशस्वी चाचणी झाल्यानंतर 4 डिसेंबर 2023 साली या बंदराला व्यावसायिक कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाले.