PMC election 2022 ward 30 : सत्तापालटानंतर पुण्याच्या राजकारणातील समीकरणंही बदलली, प्रभाग क्रमांक 30 मध्ये कोणत्या पक्षाची कुणाला उमेदवारी, कोण बाजी मारणार?

| Updated on: Aug 20, 2022 | 10:13 AM

राज्यातील सत्तांतरानंतरचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवरही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्यातील सत्ताधारी भाजपचा महापालिकेवरील झेंडा कायम राहणार की पुण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होऊन भाजपला सत्तेच्या खुर्चीतून खाली खेचलं जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

PMC election 2022 ward 30 : सत्तापालटानंतर पुण्याच्या राजकारणातील समीकरणंही बदलली, प्रभाग क्रमांक 30 मध्ये कोणत्या पक्षाची कुणाला उमेदवारी, कोण बाजी मारणार?
Follow us on

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महाराष्ट्र महानगरपालिका  कायद्यातील नागरी निवडणुकांशी संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पुणे महानगरपालिकेला (PMC election 2022) पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. जे प्रत्येक महानगरपालिकेसाठी नगरसेवकांचे संख्याबळ निश्चित करण्याची पूर्वीची पद्धत पुनर्संचयित करेल, तसेच नागरी संस्थांची सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया (Election Process) रद्द करेल. त्यामुळे नवी प्रभाग रचना पुर्णपणे बंद होईल. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतरचा परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवरही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्यातील सत्ताधारी भाजपचा महापालिकेवरील झेंडा कायम राहणार की पुण्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होऊन भाजपला सत्तेच्या खुर्चीतून खाली खेचलं जाणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द केला आहे.  महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिकेत निवडणूक प्रभाग रचना बदलत तीन सदस्यांचा वॉर्ड केला होता. पण राज्य सरकारने पूर्ण नवा निर्णय घेतला आणि पुणे महानगरपालिकेत चार सदस्यांचा प्रभाग असेल, असे जाहीर केले. या निर्णय बदलाने पुणे महापालिकेला जवळपास दीड कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

प्रभाग क्र. : 30 जयभवानी नगर – केळेवाडी व्याप्ती :

एआरएआय हिल, वेताळ टेकडी, रामबाग कॉलनी, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एफटीआयआय, रेसिडेन्शियल कॉलनी, हनुमाननगर इ.

पुणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या

2011 च्या जनगणनेनुसार पुणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 तर, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 41 हजार 561 इतकी आहे.

प्रभाग क्रमांक 29 ची लोकसंख्या

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 ची लोकसंख्या 65 हजार 177 इतकी आहे. त्यात अनुसूचित जाती 5 हजार 572 तर, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 536 इतकी आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर