…तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jun 04, 2019 | 2:51 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सल्ला दिला आहे.

...तर काँग्रेस एनजीओ म्हणून शिल्लक राहील : प्रकाश आंबेडकर
Follow us on

अकोलो : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक इशारा दिला आहे. काँग्रेसला आपले संघटन मजबूत करायचे असेल, तर त्यांनी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवाव्या, अन्यथा काँग्रेस केवळ एनजीओ (NGO) म्हणून शिल्लक राहिल, असा इशारा आंबेडकरांनी दिला.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “काँग्रेसने युतीच्या राजकारणात त्यांची संघटना मातीत मिळवला. संघटन उभं करायचं असेल तर कार्यकर्त्याला न्याय द्यायला हवा. हा न्याय देण्यासाठी त्यांना विधानसभेत सर्व 288 जागा लढवाव्या लागतील. तरच काँग्रेस पुन्हा उभी राहु शकेल. नाहीतर काँग्रेस एनजीओ म्हणूनच उभी राहिल.”

यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यशावर भाष्य करताना शिवसेनेलाही लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना कोमामध्ये गेली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या परिस्थितीत राज ठाकरेंना एक चांगली संधी असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे शिवसेना भाजपमधील मतदारांना सहजपणे आकर्षित करु शकतात, असेही त्यांनी नमूद केले.