अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर

| Updated on: Nov 04, 2020 | 9:59 AM

मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. Prakash Jawadekar criticise Maharashtra Govt on arrest of Arnab Goswami

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर
Follow us on

नवी दिल्ली: रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुंबईत पत्रकारितेवर जो हल्ला झाला आहे तो निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकाची कारवाई आणीबाणीसारखी आहे. आम्ही या कारवाईचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. (Prakash Jawadekar criticise Maharashtra Govt on arrest of Arnab Goswami)

प्रकाश जावडेकर यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने  केलेल्या कारवाईची निंदा करतो, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यानंतर अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या व्हिडीओची आणि अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”

संबंधित बातम्या :

Arnab Goswami Arrested LIVE | सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार, अर्णव गोस्वामींच्या अटकेवरुन कंगनाचा घणाघात

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी- राम कदम.

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

(Prakash Jawadekar criticise Maharashtra Govt on arrest of Arnab Goswami)