बीडच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाच्या नेत्याचा तडकाफडकी संन्यास, मंत्रीपदाची वाट पाहिली पण…

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी एक घडामोड घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय सन्यास जाहीर केला आहे.

बीडच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाच्या नेत्याचा तडकाफडकी संन्यास, मंत्रीपदाची वाट पाहिली पण...
prakash solanke political retirement
Image Credit source: social media
| Updated on: Nov 15, 2026 | 5:58 PM

एकीकडे राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या घडामोडींवर विविध विधानं केली जात आहेत. विविध नेते विविध तर्कवितर्क लावत आहेत. तर दुसरीकडे आजा राज्यातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या बीडमधून मोठी घडामोड समोर आली आहे. बीडच्या माजलगावच्या राजकारणातून ही मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण स्वतः निवडणूक लढवणार नसून पुतण्या जयसिंह सोळंके यांना उमेदवारी दिली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे सोळंके यांनी आपला राजकीय वारसदार निश्चित केलाय. याबद्दल त्यांनी थेट मंचावरुनच घोषणा केली आहे.

एका विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, त्यांनी सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्ती घेतल्याचं स्पष्ट केलेलं नाही.

Loading...

नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंके?

आगामी विधानसभा निवडणुकीत मी स्वतः उमेदवार म्हणून तुमच्यासमोर येणार नाही, तर माझा पुतण्या जयसिंग सोळंके यांना आमच्याकडून उमेदवारी दिली जाईल, असं मोठं विधान प्रकाश सोळंके यांनी केलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोळंके यांनी राजकारणातून माघार घेण्याचे संकेत दिले असून, आता माजलगावच्या राजकारणात जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाची नवी इनिंग सुरू होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्रीपदाची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली

दरम्यान, मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात होत असलेल्या आरोपांनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला जात आडवी येत असल्याने मंत्रीपद दिलं जात नाही. मी ओबीसीमध्ये जन्मलो असतो तर संधी मिळाली असती, असं थेट वक्तव्य त्यांनी केलं होतं. गेल्या ४५ वर्षांमध्ये बीडमधील एकाही मराठा व्यक्तीला कॅबिनेट आणि पालकमंत्रीपद मिळालं नसल्याचं त्यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us