जातीयता, धर्मांधतेचं विष पेरलं जातंय; देशाच्या विभाजनाचा डाव…, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल

| Updated on: Oct 26, 2022 | 2:10 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे.

जातीयता, धर्मांधतेचं विष पेरलं जातंय; देशाच्या विभाजनाचा डाव..., पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदी (Modi) सरकारवर घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टोला लगावला आहे. देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरतंय असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आम्ही विरोधीपक्षात आहोत मग आम्ही मोदीचं कौतुक का करायचं असा सवालही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे

नेमकं काय म्हटलं चव्हाण यांनी?

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारचा देशाचे विभाजन करण्याचा डाव आहे. केंद्र सरकारकडून देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरलं जात आहे. आम्ही विरोधी पक्षात मग मोदीचं कौतुक का करायचं? मी टीका करत राहीन भाजपाने उत्तर द्यावं असं पृथ्वीराज  चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा दौरा करणार आहेत यावरून देखील टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, सोबत अयोध्येला पण जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, राज्याचा दौरा केला पाहिजे. राज्यातील जनेतची दु:ख समजून घेतली पाहिजेत. राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे. राज्यात जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत असतील तर चांगली गोष्ट आहे.