Chatrapati SambhajiRaje : पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, संभाजीराजेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी

सलग दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांच्या समर्थकांनी शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी केल्याचं दिसून आलं.

Chatrapati SambhajiRaje : पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, संभाजीराजेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी
छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी
Image Credit source: social
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 10:44 AM

नवी मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Chatrapati SambhajiRaje) यांना शिवसेनेनं (Shivsena) राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना विरुद्ध संभाजीराजे असं चित्र राज्यात पहायला मिळालंय. यावेळी संभाजीराजे यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान, शिवसेनेनं संभाजीराजे यांच्यासमोर शिवबंधन बांधण्याची अट ठेवली आणि सगळं काही फिसकटल्याचं पहायला मिळालं. यातच आता सलग दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) संभाजीराजे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केल्याचं दिसून आलं. यावेळी पोस्टरमधून सत्ताधारी शिवसेनेला आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असं पोस्टरवर दिसून येतंय. तर आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, असाही उल्लेख या पोस्टरमध्ये आढळतो. राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 बाकी है, असा थेट इशाराच पोस्टरमधून देण्यात आलाय.  बॅनरवरील मजकूर सर्वांचे लक्ष आकर्षित करत असून पुन्हा एकदा संभाजीराजे विरुद्ध शिवसेना वाद  निर्माण झाल्याचं दिसतंय.

शिवसेनाभवनासमोर बॅनरबाजी

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संभाजीराजेंनी फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही होती. दरम्यान, काल देखील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी दिसून आली. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, असाच मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता. आधीच पराभवामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेला ही बॅनरबाजी अधिक जिव्हारी लागू शकते.

संभाजीराजेंचं ट्विट

बॅनरबाजीवर छत्रपतींची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी काल बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली होती. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे फ्लेक्स लावले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही. मी राजकारणात येणार असलो तरी ‘स्वराज्य’ ला तत्त्वांची बैठक असेल, अशी प्रतिक्रिया देणारे ट्विट संभाजीराजेंनी काल दिली होती.