पुण्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, ‘राजगर्जना बाईक रॅली’पूर्वी कारवाई

| Updated on: Feb 08, 2020 | 11:01 AM

पुणे : पुण्यात ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. पुणे पोलिसांनी बाईक रॅलीला (Pune MNS Rajgarjana Bike Rally) कालच परवानगी नाकारली होती. पोलिसांनी परवानगी न दिल्यास ठरलेल्या वेळेत विनापरवानगी बाईक रॅली काढण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना […]

पुण्यात मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, राजगर्जना बाईक रॅलीपूर्वी कारवाई
Follow us on

पुणे : पुण्यात ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली. पुणे पोलिसांनी बाईक रॅलीला (Pune MNS Rajgarjana Bike Rally) कालच परवानगी नाकारली होती.

पोलिसांनी परवानगी न दिल्यास ठरलेल्या वेळेत विनापरवानगी बाईक रॅली काढण्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे रॅलीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे परवानगी नाकारल्याचा आरोप मनसेकडून पोलिसांवर करण्यात आला आहे. बाईक रॅलीत मनसेचे 5 हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा मनसेकडून केला जात होता.

सकाळी अकराच्या सुमारास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात येणार होती. या फेरीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून त्याचा त्रास नागरिकांना होईल, यामुळे दुचाकी फेरीला (Pune MNS Rajgarjana Bike Rally) पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या (रविवार 9 फेब्रुवारी) दुपारी बारा वाजता मोर्चा काढणार आहे. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.