सिद्धू विरुद्ध कॅप्टन : जेव्हा अझरुद्धीनसोबतच्या वादानंतर सिद्धूने इंग्लंड दौरा तडकाफडकी अर्धवट सोडला

| Updated on: Sep 29, 2021 | 10:07 AM

नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात टोकाचा वाद होता. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी सिद्धू यांच्या गटाची होती. ही मागणी अखेर मान्य झाली आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पायऊतार व्हावं लागलं. नवज्योतसिंह सिद्धू आणि कॅप्टनचा वाद काही नवा नाही.

सिद्धू विरुद्ध कॅप्टन : जेव्हा अझरुद्धीनसोबतच्या वादानंतर सिद्धूने इंग्लंड दौरा तडकाफडकी अर्धवट सोडला
Mohammad Azharuddin_navjot sidhu
Follow us on

चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress) मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह (Amrinder Singh) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये वादळ उठलं आहे. मुख्यमंत्रिपदी चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांची नियुक्ती झाली. त्यांनी 20 सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता सर्व सुरळीत होईल असं वाटत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Sidhu resignation) यांनी 8 दिवसात म्हणजे 28 सप्टेंबरला आपला राजीनामा दिला. त्याचवेळी तिकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये उठलेलं वादळ हे इतक्यात थांबण्याची शक्यता कमी आहे.

सिद्धूच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या 5 नेत्यांनी राजीनामा सोपवला आहे. यामध्ये पंजाब काँग्रेसचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल आणि कॅबिनेट मंत्री रजिया सुल्ताना, महासचिव योगिंदर धिंगरा आणि पंजाब काँग्रेसचे महासचिव (प्रभारी प्रशिक्षण) गौतम शेठ यांचा समावेश आहे.

नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात टोकाचा वाद होता. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी सिद्धू यांच्या गटाची होती. ही मागणी अखेर मान्य झाली आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पायऊतार व्हावं लागलं. नवज्योतसिंह सिद्धू आणि कॅप्टनचा वाद काही नवा नाही.

सिद्धू आणि कॅप्टन वाद

नवज्योतसिंग सिद्धूची ही बंडखोर शैली पहिल्यांदा समोर आलीय असं नाही. क्रिकेट, राजकारण ते टीव्हीच्या स्क्रीनवर सिद्धूचं विविध रुप देशाने पाहिलं. राजकारणी सिद्धूच्या आधी क्रिकेटपटू सिद्धूनेही भर मैदानात बंड केलं होतं. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर होती, त्यावेळी फलंदाज असलेल्या सिद्धूचा आणि कर्णधार अझरुद्दीनचा वाद झाला. या वादानंतर सिद्धूने भर मैदानात बंड पुकारुन, दौरा अर्धवट सोडला होता. इतकंच नाही तर सिद्धू मैदान सोडून इंग्लंडमधून भारतात परतला होता. त्यावेळी सिद्धूने कोणालाही त्याची माहिती दिली नव्हती.

इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय झालं होतं?

भारतीय संघ 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे होते . टीम इंडियाचे नेतृत्व मोहम्मद अझरुद्दीन करत होता. तर इंग्लंड संघाची धुरा मायकल एथरटनकडे होती. या दौऱ्यात नवज्योतसिंग सिद्धू टीम इंडियाचा सलामीवीर म्हणून संघात होता.

पहिला कसोटी सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये नवज्योतसिंग सिद्धूला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. पण या सामन्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू कोणालाही काहीही न बोलता इंग्लंडहून थेट भारतात परतला. मात्र सिद्धू तडकाफडकी का गेला हे कोणालाच कळलं नाही. मग बीसीसीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, ज्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या.

बीसीसीआयचे त्यावेळचे सचिव जयवंत लेले यांनी आपलं पुस्तक “I was There – Memoirs of a Cricket Administrator” यामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यावेळी सिद्धूचा आणि अझरुद्दीनचा वाद झाला होता. त्यामुळेच सिद्धू तडकाफडकी इंग्लंड दौरा मध्येच सोडून भारतात परतला होता.

पुस्तकातील उल्लेखानुसार, “कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वांसमोर अपशब्द वापरल्यामुळे सिद्धू नाराज होता. हे प्रकरण न थांबल्यामुळेच सिद्धू दौऱ्यावरून परत आला होता.

संबंधित बातम्या 

नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात; सिद्धूंचा पुढचा प्लॅन काय?

पंजाबमध्ये राजकीय भूकंप! नवज्योत सिंह सिद्धूसह काँग्रेसच्या 5 नेत्यांचा राजीनामा