
मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुलगा सुजय पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरमधील जाहीर सभेत राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटीलही सुजयप्रमाणे 12 चा मुहूर्त साधण्याची चिन्हं आहेत. सुजय विखे पाटील यांनी 12 मार्चला दुपारी 12 च्या सुमारास भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटीलही 12 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत.
येत्या 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. याच सभेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्हं आहेत.
गेल्या महिन्यात 12 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.
आता येत्या 12 एप्रिलला अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये 12 चा मुहूर्त साधून प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपवला होता. गेल्या महिन्यात 19 मार्च रोजी राधाकृष्ण विखेंनी आपला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. त्यातच सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने पक्ष सोडल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दबाव वाढला होता. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांनी
संबंधित बातम्या
राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता
सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा!
राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार, हायकमांडला निर्णय कळवला?
पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
सुजयविरोधात प्रचार करणार नाही : विखे पाटील
मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे