मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे

मुंबई: “भाजपच्या पोरांसोबत मी इतर पोरांचाही विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही, असा निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लगावला”. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा सवाल करत शरद पवारांनी  राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला होता. त्यावरुन आज उद्धव …

मी दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे

मुंबई: “भाजपच्या पोरांसोबत मी इतर पोरांचाही विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही, असा निशाणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लगावला”.

माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा सवाल करत शरद पवारांनी  राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला होता. त्यावरुन आज उद्धव ठाकरेंनी पवारांना टोमणा लगावला. भाजपमध्ये दाखल झालेल्या सुजय विखे पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वाचा – शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती  

आदित्य ठाकरे यांच्यावर माझं कोणतंही बंधन नाही, निवडणूक लढवायची की नाही तो ठरवेल. पण यंदा तरी तो निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले होते. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार हे अष्टपैलू आणि चांगले नेते आहेत. पण ते भविष्य कधीपासून सांगायला लागले?

निवडणुकीच्या रणनीतीचा कच्चा आराखडा काल तयार झाला आहे. निर्णय झाले आहेत. जालन्याबाबत माझ्याकडे ते येतील आणि समोरासमोर बोलणं होईल. युतीत मिठाचा खडा कोण टाकू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती  

शरद पवारांसाठी माढ्यात उपोषण   

विखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात  

भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *