भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावं आहेत. आज आणि उद्या ही यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपच्या 7 उमेदवारांची नावं : नागपूर -नितीन गडकरी चंद्रपूर – हंसराज अहीर जालना – रावसाहेब दानवे पुणे – गिरीश बापट (UPDATE 12.16 PM : गिरीश बापटांची लोकसभेच्या रिंगणातून …

भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावं आहेत. आज आणि उद्या ही यादी जाहीर केली जाणार आहे.

भाजपच्या 7 उमेदवारांची नावं :

  1. नागपूर -नितीन गडकरी
  2. चंद्रपूर – हंसराज अहीर
  3. जालना – रावसाहेब दानवे
  4. पुणे – गिरीश बापट (UPDATE 12.16 PM : गिरीश बापटांची लोकसभेच्या रिंगणातून माघार) 
  5. अकोला – संजय धोत्रे
  6. भिवंडी – कपिल पाटील
  7. गडचिरोली – अशोक नेते

पुण्यात गिरीश बापट यांची माघार

राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर भाजप कोणाला तिकीट देणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभेतून भाजपकडून तिकीट मिळाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता गिरीश बापट यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपकडून कोण, हा प्रश्न पुन्हा उपस्थित राहिला आहे.

जालन्यात रावसाहेब दानवेच

शिवसेना-भाजपचा सर्वात मोठा तिढा असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना तिकीट निश्चित केलं आहे. इथे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.

भिवंडीतून पुन्हा कपिल पाटलांना उमेदवारी

भिवंडीतून भाजपकडून पुन्हा कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीतील स्थानिक शिवसेना कार्यकर्ते आणि केबल ऑपरेटर्सकडून कपिल पाटील यांना विरोध असतानाही, भाजपने पुन्हा एकदा भिवंडीतून कपिल पाटील यांना संधी दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *