शरद पवारांसाठी माढ्यात उपोषण

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. सोलापुरातील सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर हे  उपोषण सुरु केलं आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर माढा मतदारसंघातील  शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटतील. शिवाय सध्याच्या सरकारच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना […]

शरद पवारांसाठी माढ्यात उपोषण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. सोलापुरातील सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर हे  उपोषण सुरु केलं आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर माढा मतदारसंघातील  शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रश्न सुटतील. शिवाय सध्याच्या सरकारच्या काळात दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याही सुटतील असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी पवारांनी निवडणूक लढवण्याचा विचार करावा अशी मागणी केली आहे.

शरद पवारांची माघार

दरम्यान शरद पवारांनी दोनच दिवसापूर्वी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली. एकाच कुटुंबातील तीन जण निवडणूक रिंगणात नको म्हणून त्यांनी माघारीचं कारण दिलं. यावेळी त्यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी अप्रत्यक्ष घोषणा केली.

शरद पवारांच्या या माघारीमुळे राज्यभरातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पवारांनी माढा लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आलं होतं. मात्र पवारांच्या माघारीमुळे कार्यकर्ते नाराज आहेत.

राधाकृष्ण विखेंचं टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करतात, असं प्रत्युत्तर विखे पाटलांनी पवारांना दिलं. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा सवाल शरद पवारांनी केला होता. त्याला विखेंनी हे उत्तर दिलं.

शरद पवारांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करत आहेत, असं विखे म्हणाले.  शिवाय माझ्या राजीनाम्याची घाई मीडियाला झालीय, मीडियाला मी काँग्रेसमध्ये नकोय का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.