दाखवून दिलंय, आम्ही काय आहोत ते : राहुल गांधी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय की, आम्ही काय आहोत ते, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील निवडणुकांचा आज निकाल लागला. यातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेत, सत्ता स्थापनेपर्यंत उडी […]

दाखवून दिलंय, आम्ही काय आहोत ते : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय की, आम्ही काय आहोत ते, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील निवडणुकांचा आज निकाल लागला. यातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेत, सत्ता स्थापनेपर्यंत उडी मारली आहे.

आजचा विजय हा जनतेचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेला सुरुवात केली.

“राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झाला आहे. आम्ही त्यांचे काम नव्याने पुढे नेत, या राज्यांना आणखी पुढे नेऊ. शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती प्राधान्याने पूर्ण करु. “, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

सपा, बसपा, काँग्रेस यांची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे कुठेही आम्हाला मुख्यमंत्रिपदासाठी अडचण येणार नाही. किंबहुना, मुख्यमंत्रिपदाची प्रक्रिया अत्यंत सहजपणे पार पडले, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, विरोधक एकत्र लढतील, हे निश्चित आहे, आम्ही किती एकजुटीने एकत्र आहोत, हेही तुम्ही पाहिले असालच, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

देशाला व्हिजन देण्यात मोदी आणि भाजप पूर्णपणे पराभूत झालेत. देशात परिवर्तन घडवण्याची चार वर्षांपूर्वी मोदींना मोठी संधी होती, मात्र दुर्दैवाने, देशवासियांच्या मनातील गोष्ट त्यांनी ऐकलीच नाही, असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. शिवाय, “आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढू, त्यांना पराभूत करु. आताही पराभव केलंय, 2019 साली पण पराभव करु. मात्र आम्ही त्यांना देशातून ‘मुक्त’ करणार नाही.”, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींसह भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, भले काँग्रेस जिंकली असेल, पण ईव्हीएमबाबतची शंका ही कायम आहे, कारण ईव्हीएमबाबत काही मुलभूत प्रश्न आहेत, असेही राहुल गांधींनी आज नमूद केले.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • निवडणुकीचे निकाल आलेत, मतदारांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार – राहुल गांधी
  • राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले, त्यासाठी त्यांचे आभार, मात्र आता बदल झालाय, आम्ही काम करत राज्याला आणखी पुढे नेऊ – राहुल गांधी
  • शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती पूर्ण करु – राहुल गांधी
  • रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील – राहुल गांधी
  • विरोधक एकत्र लढतील, हे निश्चित आहे, आम्ही किती एकजुटीने एकत्र आहोत, हेही तुम्ही पाहिले असालच – राहुल गांधी
  • भले काँग्रेस जिंकली असेल, पण ईव्हीएमबाबतची शंका ही कायम आहे, कारण ईव्हीएमबाबत काही मुलभूत प्रश्न आहेत – राहुल गांधी
  • राफेल घोटाळा झालाय, हे वास्तव आहे आणि ते समोर येईलच – राहुल गांधी
  • मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी कुठेही अडचण नाही, ती प्रक्रिया सहज पूर्ण होईल – राहुल गांधी
  • आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढू, त्यांना पराभूत करु, आताही पराभव केलंय, 2019 साली पण पराभव करु, मात्र आम्ही त्यांना देशातून ‘मुक्त’ करणार नाही – राहुल गांधी
  • सगळ्या विचारधारांचा मी आदर करतो, कुणालाही ‘भारतमुक्त’ करु इच्छित नाही – राहुल गांधी
  • देशाला व्हिजन देण्यात मोदी आणि भाजप पूर्णपणे पराभूत झालेत – राहुल गांधी
  • देशात परिवर्तन घडवण्याची चार वर्षांपूर्वी मोदींना मोठी संधी होती, मात्र दुर्दैवाने, देशवासियांच्या मनातील गोष्ट त्यांनी ऐकलीच नाही – राहुल गांधी
  • जनतेला दाखवलेलं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले नाही – राहुल गांधी
  • मी स्पष्ट सांगू? शेतकऱ्यांच्या समस्यांवरील उपाय खूप कठीण आहेत, मात्र एक नक्की, की आम्ही ते उपाय शोधू आणि अंमलात आणू – राहुल गांधी
  • काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय की, आम्ही काय आहोत ते! – राहुल गांधी

VIDEO : राहुल गांधी यांची संपूर्ण पत्रकार परिषद :