AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम अदानी अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो फोटो, जो राहुल गांधी यांनी लोकसभेत दाखवत प्रश्न विचारला.. ये रिश्ता क्या कहलाता है?

भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी काही फोटो दाखवले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राहुल गांधी यांना हाटकलं.

गौतम अदानी अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो फोटो, जो राहुल गांधी यांनी लोकसभेत दाखवत प्रश्न विचारला.. ये रिश्ता क्या कहलाता है?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 07, 2023 | 3:57 PM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्लीः भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेतून संपूर्ण भारत भ्रमंती करून आलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत जोरदार भाषण केलं. संपूर्ण यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अदानी-अंबानी (Adani-Ambani) उद्योगपतींवर निशाणा साधला. लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी दमदार भाषण केलं. अग्निवीर भरती तसेच गौतम अदानी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी-अदानी यांचे नेमके संबंध काय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देशाला जाणून घ्यायचंय, असं राहुल गांधी म्हणाले.

Modi

राहुल गांधी यांनी हा फोटो लोकसभेत दाखवला

भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी काही फोटो दाखवले. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राहुल गांधी यांना हाटकलं. संसदेत पोस्टरबाजी योग्य नाही, असे म्हणाले. यावरून राहुल गांधी म्हणाले, हे पोस्टर्स नाहीत. या जुन्या फोटोत यांचे चेहरे अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. मोदी अदानींच्या विमानातून जात असतानाचा हा फोटो आहे. 2014 मध्ये जे अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 609 व्या स्थानी होते. तेच मोदीजी दिल्लीत आल्यानंतर त्यांच्या जादूमुळे सर्वात कमी वेळेत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, अदानींची भारताबाहेर शेल कंपनी आहे. ही शेल कंपनी कुणाची आहे? हजारो कोटी रुपये शेल कंपनी भारतात पाठवतेय, हा पैसा कुणाचा आहे? अदानी हे काम मोफत करत आहेत का? संदर्भात भारतीय कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही का? हे कोण लोक आहेत? ह्या कोणाच्या कंपनी आहेत… याचं उत्तर मिळायला हवं, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.

आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानींसोबत विदेशात जात होते. मात्र आता गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने विदेशात जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

एअरपोर्टच्या ठेक्यावरून सवाल

अदानी यांच्याकडे एअरपोर्टचा अनुभव नाही. मात्र नियम बदलून त्यांना सहा एअरपोर्टची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे संरक्षण क्षेत्राचाही अनुभव नसताना ड्रोन बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. एचएएलवरही आम्ही चुकीचे आरोप लावले, असे पंतप्रधान म्हणाले, मात्र खरं तर एचएएलचा 126 विमानांचा ठेका अनिल अंबानी यांच्याकडे गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सत्तेचा गैरवापर?

सरकारी सत्तेचा वापर उद्योगधंदे वाढवण्यासाठी कसा करावा, याबद्दल अदानींच्या उदाहरणावरुन हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये धडे दिले पाहिजेत आणि यामध्ये मोदींना गोल्ड मेडल द्यायला हवं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.

Follow Us
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!