मुंबईत विकास करतोय, महाराष्ट्रापासून वेगळं करायला नाही, तर मुंबईला…- राहुल शेवाळे

खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईच्या विकासावर भाष्य केलंय. पाहा...

मुंबईत विकास करतोय, महाराष्ट्रापासून वेगळं करायला नाही, तर मुंबईला...- राहुल शेवाळे
| Updated on: Oct 15, 2022 | 2:48 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईच्या विकासावर भाष्य केलंय. “मुंबईत पायाभूत विकास यासाठी नाही करत आहोत की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करायचंय, तर मुंबईला आम्हाला जागतिक दर्जाचे शहर बनवायचंय”, असं शेवाळे म्हणालेत. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी (Mumbai Development) महत्वाची पावलं उचलली जातील. डीपी प्लान हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो देखील अंमलात आणला जाईल आम्हाला स्पेशल फंडची गरज आहे. पण राज्य सरकारकडे इतका निधी नाहीये. केंद्र सरकारकडून हा स्पेशल फंड मिळावा अशी अपेक्षा आहे, असं शेवाळे (Rahul Shevale) म्हणालेत.

मुंबईच्या पायाभूत विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत आणि हे सगळे प्रकल्प मार्गी लागावे यासाठी राज्य सरकारकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आम्ही मिशन 2034 नियोजन आखलंय, असंही शेवाळे म्हणालेत.

मुंबईतील अनेक प्रकल्प आहेत जे मार्गी लागणे गरजेचे आहे. ज्यात वर्सोवा बांद्रा सी-लिंक, मिसिंग लिंक, ठाणे क्रिक पूल, पुणे रिंग रोड, मल्टी मॉडेल कॉरिडोर, विरार अलिबाग कोकण एक्सप्रेस वे, वर्सोवा विरार सी लिंक , नाशिक इंटरचेंज रोड, ठाणे घोडबंदर या कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प मार्गी लावायला हवेत, असंही शेवाळेंनी म्हटलंय.

ज्या प्रकारे दिल्लीमध्ये वीज पाणी शिक्षण आणि ट्रान्सफोर्ट मोफत आहे. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात विचार सुरू आहे. आयएसची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ती आपला अभ्यास रिपोर्ट येता काही दिवसात मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करणार आहे. त्यावर मुख्यमंत्री लवकरच त्यावर निर्णय घेतील, असं शेवाळे म्हणालेत.