Raj Thackeray Birthday : जबरा फॅन! राज ठाकरेंची छबी त्यानं छातीवर गोंदली, म्हणाला, ‘हॅपी बर्थडे साहेब’

| Updated on: Jun 14, 2022 | 8:28 AM

Raj Thackeray : राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. आज ते 55 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

Raj Thackeray Birthday : जबरा फॅन! राज ठाकरेंची छबी त्यानं छातीवर गोंदली, म्हणाला, हॅपी बर्थडे साहेब
राज ठाकरेंची जबरा फॅन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अशातच राज ठाकरेंचा एक जबरा फॅन (Jabara Fan) समोर आलाय. राज ठाकरेंची छबी एका तरुणानं राज ठाकरेंची धबी आपल्या छातीवर गोंदली आहे. हा तरुण सोलापूर जिल्ह्यात राहणारा आहे. सोलापूरच्या (Solapur News) माढा तालुक्यातील मोडनिंब इथं राहणारा हा तरुण असून तो राज ठाकरेंचा अनेक वर्षांपासून चाहता आहे. राज ठाकरे कायम हृदयात राहावेत यासाठी मी हा टॅटू छातीवर गोंदवून घेतला असल्याचं त्यानं म्हटलंय. मोडनिंबमध्ये राहणाऱ्या या तरुणाची सध्या चर्चा रंगली आहे. मोडनिंबमधील या तरुणाचं नाव आहे, विशाल भांगे! राज ठाकरेंचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे चाहते आहेत. त्याच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाशिवायही एक व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांचा चाहतावर्ग मोठाय. पण म्हणून थेट छातीवर राज ठाकरेंची छबी गोंदवून घेणारा, विशाल भांगे हा राज ठाकरेंचा पहिलाच चाहता असावा.

पाहा व्हिडीओ :

बाळा नांदगावकरांकडून कौतुक

विभाल भांगे हा राज ठाकरेंचा निस्मिम चाहता आहे. त्याने राज ठाकरेंची छबी आपल्या छातीवर कोरुन घेतलीय. संपूर्ण तालुक्यात या तरुणाची चर्चा रंगली. या तरुणाबद्दल कळल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर देखील या तरुणाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले होते. विशालची भेट घेऊन बाळा नांदगावकरांनी त्यांच कौतुकही केलंय.

राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. आज ते 55 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. दरम्यान, यंदाचा वाढदिवस हा साधेपणानेच साजरा करणार असून कुणाचीही भेट घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. वाढदिवशी भेटायला घरी येऊ नका, जिथे आहात तिथूनच शुभेच्छ द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलं होतं.

राज ठाकरेंवर जून महिन्याच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यानंतर ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि चाहत्यांना आवाहन करत तुम्ही जिथे आहात, तिथूनच मला शुभेच्छा द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी सगळ्यांना केलं होतं. घरातच क्वारंटाईन असल्यामुळे राज ठाकरे यावेळी वाढदिवशी कुणाचीही भेट घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

बाळा नांदगावकरांकडून कौतुक

कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यानंतर पुन्हा इतरांना भेटी-गाठीत संसर्ग पसरु नये, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे वाढदिवशी कुणीही घरी येऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.