बाळासाहेब ठाकरेंचा Video राज ठाकरेंकडून Tweet! 36 सेकंदाच्या ‘त्या’ Video पलिकडची गोष्टही महत्त्वाचीए

| Updated on: May 04, 2022 | 9:42 AM

Raj Thackeray Balasaheb Thackeray Video Tweet : राज ठाकरेंनी शेअर केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र त्याच स्वरुपाचा आणखी एक व्हिडीओ युट्युबवर सापडतो.

बाळासाहेब ठाकरेंचा Video राज ठाकरेंकडून Tweet! 36 सेकंदाच्या त्या Video पलिकडची गोष्टही महत्त्वाचीए
राज ठाकरेंच्या ट्वीटची चर्चा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray News) शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला. 36 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या (Azaan Loudspeaker controversy) मुद्द्यावर बोलताना दिसतात. चार मे रोजी सकाळीच बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट करत राज ठाकरेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. चार मे रोजीचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिलेला होता. त्यानंतर आज काही प्रमाणात मशिदींवरील भोग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येतंय. मात्र राज ठाकरेंनी आधीच केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिदास दिला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मशिदींनी भोंग्याच्या आवाजाचा नियम पाळला. तर काहींनी भोंगा वापरणंच टाळलं. या सगळ्यात राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडीओनं चर्चांना उधाण आलंय.

‘त्या’ व्हिडीओमध्ये काय?

राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भाषण करताना दिसतात. त्यांनी मुस्लिम बांधवांच्या अजान आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलंय, की…

ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईळ, त्यावेळी रस्तावर केले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. (जोरदार टाळ्यांचा आवाज) कारण धर्म असा असावा लागतो की जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नाही, लोकांना उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा तुम्हाला कुणाला उपद्रव होत असेल तर मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदींवरचे खाली येतील, बंद! (यानंतर जोरदार टाळ्यांचा आवाज…)

पाहा राज ठाकरेंनी केलेलं ट्वीट :

 

36 सेकंदांच्या व्हिडीओच्या पलिकडची गोष्ट!

राज ठाकरेंनी शेअर केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र त्याच स्वरुपाचा आणखी एक व्हिडीओ युट्युबवर सापडतो. ज्यात बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम बांधव आणि शिवसेना यांच्याबाबत बोलताना दिसतात. गर्जा हिंदुस्तान या युट्युब चॅनेलवर तीन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे. 12 ऑक्टोबर 2018 साली अपलोड करण्यात आलेल्या हा व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याच भाषणाचा आहे, ज्या भाषणातील काही भाग राज ठाकरेंनी शेअर केलाय. राज ठाकरेंनी शेअर केलेल्या भाषणाच्या व्हिडीओची आणखी एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलंय की,

खरं म्हणजे मुसलमानांच आणि आमचं भांडण नाही, हे अजून किती वेळा सांगायचं. तुम्हाला अजून काय सांगायचं म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास बसेल? असंही बाळासाहेब ठाकरे यांनी या भाषणात म्हटलंय. मागे मी बोललो होतो, की आम्हाला मुसलमानांची मतं नकोत, पण कोणत्या मुसलमानांची मतं नकोत? जे पाकिस्तानबद्दल अभिमान बाळतात, अशा देशद्रोही मुसलमानांची मतं आम्हाला नकोत!

पाहा त्याच भाषणाचा मोठा व्हिडीओ :

पाहा महत्त्वाची बातमी :