ज्ञानेश कुमार यांचं काही खरं नाही! राज-उद्धव ठाकरेंना मोठ्या नेत्याची साथ, थेट मोर्चात येणार, जंतरमंतरची…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 4 ऑक्टोबर महामोर्चा काढणार असल्याचे सांगितले. आता या मोर्चाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांना अल्टिमेटम दिला. त्यापाठोपाठ ठाकरे बंधूही एकवटले आहेत. याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. आता देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक असलेला नेता देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
४ ऑक्टोंबर २०२६ राज आणि उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही उपस्थिती लावली जाणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांची आजच्या प्रेस मधून दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून ४ ऑक्टोंबर ला केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्याविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. ठाकरे बंधू या मोर्चात नेतृत्व करत एकत्र आवाज उठविणार आहे. तसेच सर्वपक्षीयांना त्यांनी सामील होण्यासाठी हाक दिली आहे.
“EVM घोळ याबाबत ही आवाज उठवायचा”
रोहित पवार यांच्या मते या मोर्चात जाणे योग्य आहे. पण आयुक्तांना विरोध करताना EVM घोळ याबाबत ही आवाज उठवायला लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच महाराष्ट्राचा ज्ञानेश कुमार कोण हे शोधावे लागणार असेही त्यांनी म्हटले.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक आयुक्तांविरोधात मोर्चा काढण्याची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली. हा मोर्चा एका पक्षापुरता न राहता तर तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी या महामोर्चात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही उपस्थिती लावली जाणार असल्याची माहिती दिली आहे. आता पुन्हा एकदा जंतरमंतरची पुनरावृत्ती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.